Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आजपासून दोन दिवस सरकारी बँक कर्मचारी संपावर; काम प्रभावित होणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अकोला, दि. १६ डिसेंबर : राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात दोन दिवसांचा संप पुकारला आहे. अकोला शहरात देखील या संपाला सुरुवात झाली आहे. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.

सरकारी बँकांच्या खासगीकरणाला बँक संघटनांचा तीव्र विरोध आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक क्षेत्रांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. ग्रामीण भागातील कर्ज वितरणावर थेट परिणाम होण्याची भीती बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी वर्तविली आहे. तसेच बँकांचे खासगीकरण झाल्यास ग्राहकांनी बँकेत ठेवलेल्या ठेवींच्या जोखमीमध्ये देखील वाढ होईल, असे या संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळेच बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी आजापासून दोन दिवसीय संप पुकारला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अकोला शहरात देखील युनायटेड फ़ोरम ऑफ बँक युनिव्हर्स च्या वतीने २ दिवसीचे संपाचे आव्हान करण्यात आले आहे. अकोला स्थित सर्व बँकातील कर्मचारी सुद्धा सहभागी होणार आहेत. युनायटेड फ़ोरम ऑफ बँक युनिव्हर्स अकोला तर्फे स्थानिक सातव चौक स्थित बँक ऑफ महाराष्ट्र, शाखेच्या वतीने कोविड नियमांचे पालन करून निषेध नोंदवण्यात आला सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा वापर करून खासगी उद्योगांना पॅकेजच्या माध्यमातून मदत दिली जात आहे. बऱ्याच खाजगी संस्थांना सरकार मदत देत आहे, त्यालाही या संघटनांचा विरोध आहे.

याशिवाय देशातील १३ कंपन्यांकडे थकीत असलेल्या ४.१६ लाख कोटी रुपयांपैकी २.८५ लाख कोटींची थकबाकी अद्यापही आहे. ती वसूल करण्यास प्राधान्य देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

चक्क रस्त्यावरच वाघाने हल्ला चढवून महिलेला केले ठार

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का; ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार

 

Comments are closed.