Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मा. खासदार डॉ. नामदेव किरसान केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या भेटीला

गडचिरोली जिल्ह्यास विशेष पकेज मिळण्याची केली विनंती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

 गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची २ डिसेंबरला दिल्ली येथे संसद भवनात भेट घेतली.

यावेळी  खासदार किरसान यांनी क्षेत्राच्या विकासासाठी  विशेष तरतूद करावी, अशी मागणी  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी दिल्ली येथे संवाद साधताना केली.  खा. डॉ. नामदेव किरसान. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र अतिदुर्गम व मागास असल्याने लोकसभा क्षेत्रातील बहुतांश भागात अद्याप पायाभूत सुविधांचा अभाव आहे. अनेक गावांत रस्ते, वीज, आरोग्य केंद्र नाही, त्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमावावा लागते. लोकसभा क्षेत्रात रोजगाराचाही अभाव आहे. त्यामुळे बेरोजगारीचेही प्रमाण वाढत आहे, अशा परिस्थितीत सर्वांगीण विकासासाठी व लोकसभा क्षेत्रातील जनतेच्या समस्याच्या निराकरणाकरिता केंद्र शासनाच्या वतीने किमान १० हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी खासदार डॉ. किरसान यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना  केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.