Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच नेचर सफारी चे उदघाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ओमप्रकाश चुनारकर 

 

  • नेचर सफारीचे नियोजनबद्द कार्यक्रम करण्यात आले असून कोरोनाचे काटेकोर नियमाची केली अंबलबजावणी. 
  • नैसर्गिक साधन संपत्ती तसेच वन्यजीव पाहण्यासाठी सयुंक्त वन व्यवस्थापन समिती गुरवळा मार्फत गुरवळा नेचर सफारी चे विधिवत उदघाटन करून जंगलात भ्रमंती केली असता पहिल्याच दिवशी अनेक पर्यटकांनी घेतला निसर्गरम्य स्थळ व वन्यजीवांचा आनंद. 
  • नेचर सफारीमुळे १० युवकांना मिळाला रोजगार (पर्यटन मार्गदर्शक) 
  • नेचर सफारी करणाऱ्या प्रती वाहनाकडून घेणार १ हजार रुपये. त्यापैकी सहाशे रुपये सयुंक वन व्यवस्थापन समितीला तर चारशे रुपये पर्यटन मार्गदर्शकाला. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली, दि. १० डिसेंबर २०२१ : गडचिरोली वनात असलेल्या वन व्यवस्थापन समिती गुरवळा मार्फत नेचर सफारी ची निर्मिती   गुरुवळा वन क्षेत्रात करण्यात आली आहे. या वन क्षेत्रात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी ५२ किमी वनाच्या आत रस्त्याची निर्मिती करून पर्यटकांसाठी नेचर सफारी चे नवे दालन उघडण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार प्राप्त झाला असून वन सयुंक्त समित्यांनाही मोठ्या प्रमाणांत फायदा होणार आहे. वन सयुंक्त समितीला मिळालेल्या आर्थिक उन्नतीतून गावाचा विकास करण्यावर मोठे भर असणार आहे. त्यामुळे वनविभागाचे वनाच्या रक्षणासह स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाल्याने हर्ष उल्लासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ताडोबा अंधारी  व्याघ्र प्रकल्पाच्या धरतीवर गडचिरोली वनवृत्तात गुरवळा येथे नेचर सफारी च्या उदघाटनाचा कार्यक्रम  जि. प. अध्यक्ष अजय कंकाडलवार यांच्या हस्ते करुण हिरवी झेंडी दाखवून सफारीची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वन संरक्षक डॉ. किशोर मानकर, प्रमुख अतिथी डॉ. कुमारस्वामी उप वनसंरक्षक गडचिरोली, सहाय्यक वन संरक्षक सोनल भडके, सयुंक वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश गेडाम, रमेश मेश्राम तसेच आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

 

गडचिरोली जिल्हा हा ७८ टक्के वनाने व्याप्त असून या जिल्ह्याला निसर्गाने भरभरून साधन संपत्ती दिली आहे. गडचिरोली पासून गुरुवळा हे गाव २० किमी अंतरावर असून या वनात विविध प्रजातीचे झाडे तसेच विविध वन्यजीव आढळून येतात. या वनामध्ये निसर्गरम्य स्थळ आहेत यामध्ये  ढोलीगोटा, वाघडोह, नारळगोटा, अस्वलहुड़कि,पातरगोटा, कोरसली डोह इत्यादि आहेत. हल्ली दोन वर्षांपासून वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. चंद्रपूर-ताडोबा च्या जंगलात वन्यजीवातील संघर्षामुळे जंगल सोडून  गडचिरोली सीमेत प्रवेश करीत असल्याने दिवसेंदिवस वन्यजीवांची संख्या वाढत आहे.

त्यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पा  प्रमाणेच गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच नेचर सफारी  गुरुवळा वन कक्षात आजपासून सुरु करण्यात आली आहे. सफारी करण्यासाठी ५२ किमी अंतर जंगलामध्ये फिरता येते.  वन्यजीवांसाठी पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन जंगलामध्ये इंधन विहिरीची निर्मिती करून सोलर पॅनल द्वारे विद्युत निर्मितीतुन मोटार पंप द्वारे स्वयंचलित पाणी बाहेर येत राहणार असून ते पाणी कृत्रिम पानवठयात जमा होत असल्याने वन्यजीवांना मोठ्या प्रमाणात मुबलक पाणी मिळनार आहे. याशिवाय पर्यटकांना वन्यजीव पाहण्यासाठी मचाणाची निर्मिती केली आहे.

यामुळे प्राण्यांची गणना करण्यासोबतच कठीण वेळी राहण्यासाठी आधारही होणार आहे. वन व्यवस्थापन समिती मार्फत पर्यटकांना राहण्याची खाण्या पिण्याची व्यवस्था गुरुवळा गावातच नियोजन  करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिकांनाही पर्यटकांमुळे रोजगार प्राप्त होणार आहे.

सयुंक्त वनव्यवस्थापन समिती गुरुवळा मार्फत उदघाटन करून जंगलात आलेल्या पाहुण्यांनी तसेच पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटला. जंगलात सफारी करीत असतांना हरीण, सांबर, नीलगाय, कोल्हा, अस्वल, मोर, ससा, रान कोंबड्या, रानमांजर, रानकुत्रा दिसल्याने पर्यटकांना व पाहुण्यांना मोठा आनंद झाल्याने ताडोबा प्रमाणेच  गुरुवळा हे हि ठिकाण जगप्रसिद्ध होणार अशी भावना व्यक्त केली.

 

Comments are closed.