लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दिनांक ७ मार्च : बहुप्रतिक्षित आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं वेळापत्रक (IPL 2021 TimeTable) जाहीर झालं आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या मोसमाचं आयोजन भारतात करण्यात आलं आहे. 14 व्या हंगामाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. या 14 व्या मोसमाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. 9 एप्रिल ते 30 मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना गत विजेच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.