लोकस्पर्श न्युज नेटवर्क
इम्फाळ, 22 मे – गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. मणिपूरमध्ये आता शातंता आहे, असा दावा मुख्यमंत्री नोंगथोंबाम बीरेन सिंह यांनी रविवारी केला आणि सोमवारी दुपारी पुन्हा मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. येथील इम्फाळ पूर्वेला दोन समुदायांमध्ये वाद झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी रिकाम्या घरांची तोडफोड केली. घरांना आग लावली. छावणीत झोपलेल्या नागरिकांवर हल्ला केला.
इम्फाळ ही मणिपूरची राजधानी आहे. येथील न्यू चेकोन भागात मेईतेई आणि कुकी समुदायांमद्ये सोमवारी दुपारी वाद झाला. स्थानिक बाजारपेठेत जागेवरुन हा वाद झाला. वाद चिघळल्याने येथे लष्कर आणि निमलष्कर दल तैनात करण्यात आले आहे. या परिसरात संचार बंदी लागू करण्यात आली आहे.
हे पण वाचा :-