Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आईला अटक, केरळमधील धक्कादायक प्रकार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था 23 जानेवारी :- आई मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना केरळमध्ये घडली आहे. लहान मुलांचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणी त्यांच्या आईला पोस्को कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. जन्मदाती वरच हे गंभीर आरोप लागल्याने न्यायालयाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. केरळ उच्च न्यायालयाने हे प्रकरण दुर्मिळ आणि गंभीर स्वरूपाचं असल्याचे म्हटले आहे. केरळच्या पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास महिला आयपीएस अधिकार्‍याकडे सोपवावा असे निर्देश दिले आहेत.

28 डिसेंबरला या महिलेला अटक करण्यात आली होती. यानंतर मुलाला त्याच्या वडीलाकडे दुबईतील शारजाह येथे पाठवण्यात आले होते. मुलाचे वडील हे दुसऱ्या महिलेसोबत राहत असून त्यांनी मुलाचं म्हणणे ऐकल्यानंतर पोलिसात मुलांच्या आई विरोधात तक्रार दाखल केली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याशिवाय विशेष तपास पथक बनवून या प्रकरणाची सखोल करून चौकशी करावी असेही सांगितले आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील कडक्कावूर इथे राहणाऱ्या महिलेवर तिच्या लहान मुलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

याप्रकरणी आरोपी महिलेने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, एखादं मूल त्यांच्या आईवर इतका गंभीर आरोप लावत असेल तर या प्रकरणाची गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करने गरजेची आहे. जर तपास करणार्‍या पथकाला बालकाच्या सुरक्षितेसाठी त्याला वडिलांपासून वेगळे ठेवावा असे वाटत असेल तर त्याला बालकल्याण समिती द्वारा संचालित केंद्रामध्ये ठेवता येऊ शकतो असेही न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाने आरोपी महिलेला जामीन मंजूर केला मात्र या घटनेने मातृत्वाच्या पवित्र संकल्पनेला डाग लागल्याचं न्यायालयाने म्हटले आहे. आपल्या मुलाला आई नऊ महिने पोटात ठेवते. त्यामुळे मूल जन्माला येण्याच्या आधी पासूनच आईचे त्याच्या मुलासंबंध निर्माण झालेले असतात आईच्या निस्वार्थ, प्रेमाची, आपलेपणाची इतर कोणत्याही प्रेमाची तुलना करता येणार नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.