Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आता अमेझाॅन करणार 10 हजार कर्मचार्यांची कपात

ई-काॅमर्स कंपन्या त्यांच्या कार्यालयात मनुष्यापेक्षा रोबोटिकच्या हातात महत्वाची कामे सोपविण्याच्या तयारीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर :-  ई-काॅमर्समधील मोठी कंपनी अमेझाॅन येत्या आठवड्यात 1 टक्के कर्मचारी म्हणजे 10 हजार कर्मचार्यांची कपात करणार आहेत. वास्तविक हा आकडा कंपनीच्या दृष्टी ने नगण्य आहे. पण या कपाती मागील एक कारण भविष्यातील बदलांची नांदी आहे. त्याचा मोठा परिणाम मनुष्यबळावर होणार आहे. या कपातीमागे एक प्रगत तंत्रज्ञान आहे. वास्तविक ई-काॅमर्स कंपन्या त्यांच्या कार्यालयात मनुष्यापेक्षा रोबोटिकच्या हातात महत्वाची कामे सोपविण्याच्या तयारीत आहेत.

अमेझाॅन काही दिवसांपासून रोबोटिक वापरावर कार्य करत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आता निर्बंध हटल्याने मालाची विक्री वाढली आहे. काम लवकर होण्यासाठी मनुष्याऐवजी रोबोटच्या माध्यमातुन करण्यात येणार आहे. अमेझाॅन मधील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात होणार आहे. न्यूयार्क टाईम्सच्या अहवालानुसार ही डिव्हाईस युनिटवर त्यांचे लक्ष केंद्रित करणार आहे. यामध्ये व्हाईस असिस्टंट अलेक्साचा वापर करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी कंपनीकडे एकुण 1.6 दक्षलक्ष पूर्णवेळ आणि अर्धावेळ कर्मचारी होते. पण कंपनीने आता रोबोटच्या माध्यमातून काही विभागात काम करण्याचा निर्णय घेतला असल्याने नवीन भरतीवर ब्रेक लावला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.