Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाची शिकार करून कातडी,चार पंजे तस्करी करणाऱ्याला अटक, वन विभागाची मध्यप्रदेशात कारवाई

मध्यप्रदेशात शेतात सापडली वाघाची कातडी, चार पंजे,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क : वाघाची शिकार करून  विविध अवयवाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीस वाघाची कातडी, वाघनखे आणि अन्य अवयवासह मध्य प्रदेशात सापळा रचून वन्यजिव तस्कराला नागपूर वन विभागाच्या पथकाने शुक्रवारी मोठ्या शिताफीने कातडीसह तस्कराला  अटक केली आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मोतीलाल केजा सलामे (वय ५५) असे वन विभागाने ताब्यात घेतलेल्या वन्यजिव तस्कराचे नाव आहे. त्याच्याा शेतातून वन विभागाने वाघाचे चार पंजे, वाघाची कातडी, मोबाईल संच आणि अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे. सलामे विरुद्ध वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम २(१६),१९, ४९, ४३ (अ), ५० आणि ५१ अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करून तातडीने सावनेर येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर करण्यात आले असून तस्कराला  ३ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नागपूर वन विभागाचे उप वनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत पथक प्रमुख उमरेड येथील सहाय्यक वन संरक्षक एन. जी. चांदेवार, खापा वन परिक्षेत्र अधिकारी पी. एन. नाईक, बुटीबोरी वन परिक्षेत्र अधिकारी एल. व्ही. ठोकळ, फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. मोहोड, सहाय्यक वन संरक्षक एस. टी. काळे यांच्या टीमने ही कारवाई केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वन्यजीव तस्कर सलामे यापूर्वीही वाघाच्या कातड्याची अशाप्रकारची  तस्करी केली आहे का? अथवा  अन्य शिकाऱ्यांच्या टोळ्यांशी संबंध आहे का ? याचा तपास  वन विभागाचे पथक करीत आहेत . त्यामुळे वन्य जीव तस्करीचे जाळे उघड होण्याची शक्यता वाढली असली तरी वनविभागाने केलेल्या कारवाई मुले वण्यजीवाचे तस्करी करणार्याचे धाबे दणाणले आहे.

हे देखील वाचा,

आठ लाख बक्षीस असलेल्या जहाल नक्षली दाम्पत्याचे गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण

चळवळी आणि राजकारण !

वडसा रेल्वे स्थानकावर सुपर गाड्यांचा थांबा द्या – ३७७ अधीन सूचनेनुसार खा. अशोक नेते यांची संसदेत मागणी

Comments are closed.