Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

४ जून दिनविशेष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आजचे पंचांग (शुक्रवार, जून ४, २०२१) युगाब्द :५१२३
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक ज्येष्ठय १४ शके १९४३
सूर्योदय : ०५:५७ सूर्यास्त : १९:०९
चंद्रोदय : ०२:३६, जून ०५
चंद्रास्त : १४:१६
शक सम्वत : १९४३ प्लव
चंद्र माह : वैशाख
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : दशमी – ०४:०७, जून ०५ पर्यंत
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा – २०:४७ पर्यंत
योग : आयुष्मान् – ०२:५०, जून ०५ पर्यंत
करण : वणिज – १५:१० पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – ०४:०७, जून ०५ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : मीन
राहुकाल : १०:५४ ते १२:३३
गुलिक काल : ०७:३६ ते ०९:१५
यमगण्ड : १५:५१ ते १७:३०
अभिजितमुहूर्त : १२:०७ ते १२:५९
दुर्मुहूर्त : ०८:३६ ते ०९:२८
दुर्मुहूर्त : १२:५९ ते १३:५२
अमृत काल : १५:३३ ते १७:१८

“अखंड जयाला देवाचा शेजार
कारे अहंकार नाही गेला।
मान अपमान वाढविसी हेवा
दिवस असता दिवा हाती घेसी।। “

१२९७ : संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्या नंतर ज्येष्ठ बंधु निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन तिर्थयात्रा करण्याकरता निघाले फिरता फिरता ते तापी नदीच्या तिरावर आले असता अचानक विज कडाडली. संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या…..

आज संत मुक्ताबाई स्मरण दिन आहे .

नूतन या अभिनेत्रीइतका बोलका चेहरा दुसर्या कुठल्याच अभिनेत्रीचा नाही. नूतनचा हिन्दी चित्रपटसृष्टीत चार दशकांचा वावर होता॰ चित्रपट सृष्टीत आपली कारकीर्द व्यतीत करणार्या शोभना समर्थ आणि कुमारसेन समर्थ या दाम्पत्याची ही ज्येष्ठ कन्या.

नूतनने अभिनयाच्या क्षेत्रात काम करावे हे शोभना समर्थ यांनीच ठरवले होते; म्हणून नूतन जेमतेम १४ वर्षांचीच असतांना तिच्यासाठी त्यानी ” हमारी बेटी ” या चित्रपटाची निर्मिती केली हमारी बेटी ‘ इतका चालला नाही; पण नूतन नावाची एक नायिका चित्रपटसृष्टीत दाखल झाली आहे, हा संदेश योग्य लोकांपर्यंत गेला. त्यामुळे तिला ” नगिना ” (दि. रवींद्र दवे ) हा रहस्यमय चित्रपट मिळाला॰ यात तिचा नायक होता नासिरखान. हा चित्रपट फक्त प्रौढांसाठी असल्याने खुद्द नायिका नूतन ही १६-१७ वर्षांचीच असल्याने ” प्रीमियर शो ” तिला बघता आला नव्हता !

नूतनला नायिका म्हणून जिया सरहद्दी यांचा कलात्मक चित्रपट ‘ हमलोग ‘ मिळाला. बलराज सहानी, अन्वर हुसेन, सज्जन, श्यामा अशा नामवंत कलाकारांच्या यात भूमिका होत्या॰ या चित्रपटाला आर्थिक यश मिळाले नाही. नंतर ‘ शीशम ‘, ‘ लैला मजनू ‘, ‘ हीर ‘ ‘ शबाब ‘ (याला नौशादचे संगीत होते), असे बहुश: पडेल चित्रपट करत तिला १९५५ साली अमिया चक्रवर्ती या प्रख्यात दिग्दर्शकांनी त्यांच्या स्वत: दिग्दर्शित केलेल्या ” सीमा ” या चित्रपटात नायिकेची भूमिका दिली . या तिच्या भूमिकेची सर्वत्र वाखाणणी झाली. या भूमिकेने तिला तिचे पहिले सर्वोत्कृष्ट अभिनयाचे ‘ फिल्म फेयर ‘पारितोषिक मिळवून दिले॰

इथपासून नूतनच्या अभिनय गुणांचा आणि लोकप्रियतेचा वारू चौखूर धावू लागला॰ ‘बारिश ‘, ‘ पेईंग गेस्ट ‘, ‘ सोने की चिडिया , अनाडी , सुजाता , अशा चित्रपटांत शहीद लतीफ, हृषीकेश मुखर्जी, बिमल रॉय यांसारख्या प्रथम श्रेणीच्या दिग्दर्शकांबरोबर काम करतांना नूतन पुरेपूर कसाला उतरली॰ या चित्रपटांत देव आनंदबरोबरच्या अवखळ भूमिका, राज कपूरबरोबर श्रीमंतीत वाढलेल्या तरुणीची, आणि सुनील दत्तबरोबर एका अस्पृश्य मुलीची भूमिका करून नूतनने आपल्या अभिनयातले अष्टपैलूत्व सिद्ध केले॰ याच काळात ” चन्दन “, ” कभी अंधेरा कभी उजाला “, ‘ आखरी दाव ‘, ‘ लाईटहाऊस ‘ सारखे सुमार चित्रपटही तिने केले॰ ” दिल्ली का ठग ” या तशा आचरट चित्रपटात तिने स्विमिंग कॉश्चुम घालून खळबळ उडवून दिली ! मात्र, गम्मत म्हणजे या वेळेस तिला स्वत:ला पोहता येत नव्हते !

‘ सुजाता’, ‘ बंदिनी ‘, ‘ मिलन ‘ या चित्रपटांनी तिला आणखी ३ फिल्म फेयर पारितोषिके प्राप्त करून दिली॰ ‘ मिलन ‘ नंतर दहा वर्षांनी ती चाळिशीत असतांना तिला परत एकदा नायिकेच्या भूमिकेसाठी ‘ मै तुलसी तेरे आंगन की ‘ या चित्रपटाने पाचवे फिल्म फेयर पारितोषिक तिच्या पदरात टाकले॰ त्या वेळेस मीनाकुमारीसह अन्य कुठल्याही नायिकेला अशी आणि इतकी पारितोषिके मिळवता आली नाहीत॰ नंतरही ‘ मेरी जंग ‘ या चित्रपटाने तिला सहाय्यक भूमिकेसाठी हे पारितोषिक मिळवून दिले.
सन् १९७४ मध्ये भारत सरकारने नूतन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
१९३६: चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९९१)

* घटना :
१६७४: राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.
१८७६: ट्रान्सकाँटिनेन्टल एक्स्प्रेस रेल्वे अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती.
१८९६: हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.
१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त सैन्याने रोम जिंकले.
१९९३: आय.एन. एस. म्हैसूर या युद्धविनाशिकेचे जलावतरण.
१९९४: वेस्टइंडिजच्या ब्रायन लाराचा ८ डावांत ७ शतकांचा नवा विक्रम.
१९९७: इन्सॅट-२डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.
२००१: नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर.

• मृत्यू :
• १९४७: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८७६)
• १९९८: इतिहासतज्ज्ञ डॉ.अश्विन दासगुप्ता यांचे निधन.

* जन्म :
१९०४: भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी भगत पुराण सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२)
१९४६: दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री व पद्मभूषण एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर,२०२०)
१९४७: विनोदी अभिनेता अशोक सराफ यांचा जन्म.
१९७४: भारतीय शेफ जॅकब सहाय्या कुमार अरुनी यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर२०१२)

Comments are closed.