Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ज्येष्ठ कवी, लेखक, संगीतकार विनयकदादा पाठारे काळाच्या पडद्याआड…

"कारभारी दमान, होऊ द्या दमान" ही त्यांची जगभर गाजलेली लावणी...  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नाशिक, दि. २७ डिसेंबर : ज्येष्ठ कवी, लेखक, संगीतकार विनयकदादा पाठारे यांचे दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. समता नगर, टाकळी, नाशिक येथे त्यांचे निवासस्थान आहे. विनायकदादा पाठारे हे वामनदादा नंतरच्या पिढीतील गायकी आणि गीत लेखनातील एक महत्त्वाचे अग्रेसर नाव होते. त्यांचे मराठी चित्रपटातील गीते आणि लावण्या प्रसिद्ध आहेत.

शास्त्रीय संगीताचा कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेतलेलं नसतानादेखील शास्त्रीय राग आणि संगीताची उत्तम जाण असलेले विनायकदादा कसलेले गायक होते. उत्तम गळा, पहाडी आवाज स्पष्ट उच्चार आणि कव्वालीचा बाज ही त्यांची खासियत होती..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चळवळीची परखड समीक्षा करतानाच त्यांच्या कविता कार्यकर्त्यांना दिशादिग्दर्शन करणाऱ्या असायच्या. संवेदनशील कवी, गीतकार, पहाडी आवाजाचा गायक, शब्द सुरांचा जाणता संगीतकार आज काळाच्या पडद्याआड गेले.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मोठी बातमी : पोलीस जवान आणि नक्षल्यांत चकमक; चकमकीत ६ नक्षल्यांचा खात्मा

अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप-लेकाचा जागीच मृत्यू 

कोरपना ते वणी मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करावे – आशिष ताजने

 

Comments are closed.