Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बदलत्या काळासोबत पत्रकारांनी विविध कौशल्ये आत्मसात करून पत्रकारिता करावी : मिलिंद खोंड

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकार दिन साजरा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

आलापल्ली, दि. ६ जानेवारी : आजची पत्रकारिता ही गतिमान झाली असल्याने बदलत्या काळासोबत पत्रकारांनी विविध कौशल्ये आत्मसात करून पत्रकारिता केली पाहिजे. सोशल मीडियामुळे आजच्या पत्रकारितेसमोर मोठे आव्हान असले तरी सोशल मीडियाचा पत्रकारांनी योग्य वापर करुन समाजाचे प्रश्न मांडले पाहिजे असे मत राज्य मराठी पत्रकार संघटनेचे अहेरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोंड यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना अहेरी तालुका तर्फे आलापल्ली येथील ग्रामपंचायत सभागृहात मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी राज्य पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ संघटक श्रीधर दुग्गीरालापाठी, जिल्हा सल्लागार व जेष्ट पत्रकार ओमप्रकाश चुनारकर आदींची उपस्थिती होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.

राज्य पत्रकार संघटनेचे जिल्हा सल्लागार ओमप्रकाश चुनारकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवी जीवनमूल्ये रूजविण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून ६ जानेवारी पत्रकारदिन म्हणून साजरा केला जातो, अशी माहिती दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश बामनकर,  संचालन अमोल कोलपाकवार यांनी तर आभार रामू मादेशी यांनी केले.

कार्यक्रमाला राज्य पत्रकार संघाच्या सदस्यांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा : 

दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू…

राज्यातील महाविद्यालयासंदर्भात मोठा निर्णय, सर्व अकृषी विद्यापीठ, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

व्याघ्र संरक्षणात सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

Comments are closed.