Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मांडवी गावातील रस्त्याची दुरवस्था..

तातडीने दुरुस्ती करण्याची अनिता धांगडा यांची मागणी. 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वसई, २४ जून : पालघर जिल्ह्यात आठवडी बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या मांडवी गावातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. गावातील रस्त्याची दुरवस्था,तसेच आठवडी बाजाराची गर्दी यामुळे येथे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी माजी नगरसेविका श्रीमती अनिता धांगडा यांनी केली आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मांडवी गावातील हा रस्ता मुख्य रस्त्याला ज्या ठिकाणी जोडल जातो त्या ठिकाणी मोठा चढाव असल्याने तसेच, गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे येथे मोठी गर्दी उसळत असते. खराब आणि अरुंद रस्ता, तसेच चाढवामुळे येथे नेहमीचं छोटेमोठे अपघात होत असतात. परंतु “महापालिका क्षेत्रात असलेल्या अनेक गाव पाड्यांकडे पालिका प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. तसेच शहराप्रमाणे ग्रामीण भागात मूलभूत सुविधा पुरवण्यात महापालिकेला नेहमी अपयश आले आहे” असा आरोप माजी नगरसेविका श्रीमती अनिता धांगडा यांनी केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महापालिका हद्दीतील ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माजी नगरसेविका श्रीमती अनिता धांगडा नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यातूनच मांडवी गावातील रस्त्याची दुरवस्था झाल्याने याबाबत त्यांनी या रस्त्याची पालिकेने तातडीने दुरुस्ती करावी यासाठी प्रभाग समिती एफ पेल्हारच्या सहाय्यक आयुक्त यांना पत्र लिहिले आहे. रस्त्याच्या या समस्येबाबत गांभीर्याने विचार करून दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.

त्यामुळे या मागणीचा वसई विरार महानगरपालिका प्रशासन किती गाभिर्याने विचार करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Comments are closed.