Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी! राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, राजद्रोहाचा गुन्हा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. २५ एप्रिल : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणे भाजपा समर्थक खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

राणा दांम्पत्यावर १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. दरम्यान दोघांच्या जामिनावर आता २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयानं त्यांच्या जामिनावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. आता रवी राणा आणि नवनीत राणा यांची कारागृहात रवानगी होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणाला जायचं असेल तर परवानगीची गरज असते. तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती. मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरुन त्यांनी चॅलेंज केलं. त्यांनी नोटिशीला न जुमानता त्यांनी शासनाला आव्हान दिलं. त्यामुळं त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, त्यामुळं त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.

सुनावणीच्या सुरुवातीला सरकारी वकीलाकडून राणा दाम्पत्याच्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अॅड रिझवान मर्चंट आणि अॅड वैभव कृष्णा यांनी रवी राणा आणि नवनीत राणांची बाजू मांडली तर प्रदीप घरत यांनी सरकारची बाजू मांडली.  रिझवान मर्चंट यांनी आंदोलकांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलन दुपारी मागे घेणाऱ्या राणा दाम्पत्यावर कारवाई केली. राणा दाम्पत्याविरोधात लावलेल्या कलमांवर देखील मर्चंट यांनी आक्षेप घेतला आणि अटकेचा विरोध केला आणि पोलिस कोठडी देण्यासही विरोध केला.

‘मातोश्री’वर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने घेतली होती. मात्र बराच गदारोळ झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मागे घेतली. परंतु या वादावर पडदा न पडता त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या घरातून अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली. राणा दाम्पत्याला रात्रभर सांताक्रुझ पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं. त्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर केलं गेलं.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! पतीनेच केली पत्नीची निर्घुण हत्या

गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी ४ किमी अंतर डोलितून पायपीट..

वनविकास महामंडळाचे नफ्याचे श्रेय कर्मचारी व अधिका-यांचे – एन. वासुदेवन

 

Comments are closed.