Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रोटरी क्लब ऑफ विरार आयोजित रक्तदान शिबिराला रेल्वे प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

विरार, दि. ३ जुलै:  रोटरी क्लब ऑफ विरार आयोजित रक्तदान शिबिराला रेल्वे प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद दिला आहे. जोरदार पाऊस सुरू असताना देखील सुजाण नागरिकांनी दाखवलेल्या संवेदनशील पणामुळे तब्बल शंभर पिशव्या रक्त संकलित झाले. यावेळी संकलित झालेले रक्त जगजिवन राम रुग्णालय ब्लड सेंटरला देण्यात आले असून सर्व रक्त दात्याना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रोटरी क्लब ऑफ विरार सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असून त्यांचाच एक भाग म्हणून शनिवार दिनांक २जुलै २०२२ रोजी विरार रेल्वे स्थानकात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते . विशेष म्हणजे या शिबिराला रेल्वे प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला असून तब्बल शंभर पिशव्या रक्त गोळा करण्यात आले . हे शिबिर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहावाजे पर्यंत चालू होते व प्रतिसाद इतका होता की वेळे अभावी शिबिर बंद करण्यात आले .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यक्रमास वि .वा. महाविद्यालयातील २६ NSS च्या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. तसेच १० कर्मचारी जगजिवन राम हाँसपिटल प रे ब्लड केन्द्र मुंबई सेंट्रल ह्याचा मोठ्या प्रमाणात सहयोग लाभला.

या शिबिरात रोटरी क्लब ऑफ विरारचे रोटेरियन राजेश कासट, चेतन मेस्त्री, संदीप साळवी, आत्मजा कासट , नंदकिशोर कासट , भक्ती चव्हाण, ऊर्मिला काटकर , प्रशांत सातवी, हितेश टेलर व रोटरी क्लब ऑफ विरारचे अध्यक्ष महेंद्र घरत सहभागी झाले होते.

हे देखील वाचा :

बस आणि ट्रकची समोरासमोर धडक.

 

 

 

Comments are closed.