Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर वादग्रस्त तलाठी निलंबित !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

सौ.वैशाली बेले

२०१२ मध्ये शासकिय सेवेत रुजू झालेले तलाठी रोहित सिंग चव्हाण यांची पार्श्वभूमी नेहमीच वादग्रस्त राहिली आहेत. मात्र, भुमाफियांशी आणि वाळू तस्करांशी साठेलोठे असल्यामुळे आर्थिक बाब पाहता वरिष्ठांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. त्यामुळेच चव्हाण यांच्या अनेक तक्रारी असून सुद्धा त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाही आजवर झाली नाही. मात्र, या कारवाहीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बल्लारपूर. ता.१० :- मागील अनेक वर्षापासून तलाठी रोहित सिंग चव्हाण यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून शासकिय दस्तावेजमध्ये अफरातफर केला. अशी तक्रार युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला शहर अध्यक्ष प्रिया झांबरे यांनी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे केली होती. या प्रकरणाची दखल घेत, प्राथमिक चौकशीत निष्काळजीपणा दिसून आल्याने बल्लारपूर सांझाचे तलाठी रोहित सिंग चव्हाण यांच्यावर बुधवार दि.०८ जून रोजी सायंकाळी उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सूर्यवंशी  ( पाटील ) यांनी चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहेत. तलाठी चव्हाण यांच्यावर झालेल्या या कारवाहीमुळे अनेक भुमाफियांचे बिंग फुटणार असल्याने या प्रकरणाशी सबंधितांचे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

तलाठी रोहित सिंग चौहान २०१२ शासकिय सेवेत रुजू झाले. मात्र, मात्र, १९९० चा सातबारा खोडतोड करुन आपल्या सहिनिशी कुळमिथे नामक व्यक्तीला दिला. सोबतच सातबारा खोडतोड प्रकरण, वाटप जमिनी खरेदी विक्री प्रकरण, आणि आदिवासी भूखंड खरेदी विक्री प्रकरणात तलाठी रोहित सिंग चव्हाण यांच्या मध्यस्थीने कोट्यावधीच्या किमतीच्या आदिवासी बांधवांचे भूखंड भुमाफियांना खरेदी विक्री करून दिली. अशी तक्रार युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे आणि पक्षाच्या महिला शहर अध्यक्ष प्रिया झांबरे यांनी राज्याचे मुख्य सचिव, जिल्हाधिकारी चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, राजुरा, तहसीलदार बल्लारपूर आणि पोलिस स्टेशन बल्लारपूर यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी केली होती. वरिष्ठांकडून मिळालेल्या आदेशावरून कारवाई करीत, उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सूर्यवंशी (पाटील) यांनी प्राथमिक चौकशीच्या आधारे कामात निष्काळजीपणा केल्याचा फटका ठेवत बल्लारपूर सांझाचे तलाठी रोहित सिंग चव्हाण यांना बुधवार दि.०८ जून रोजी सायंकाळी ६ महिन्यासाठी निलंबित केले. चव्हाण यांचा तात्काळ पदभार काढून त्यांच्या ऐवजी तलाठी शंकर खरूले यांना देण्यात आला आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्राथमिक तपासणीत शासकीय कामात निष्काळजीपणा पणा केल्याचे दिसून आले. त्यामूळे तलाठी रोहित सिंग चव्हाण यांना ६ महिन्यासाठी मा. उपविभागीय अधिकारी मॅडम बल्लारपूर यांनी निलंबित केले आहे. त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल.

संजय राईचवार

बल्लारपूर तहसीलदार 

तलाठी रोहित  सिंग चव्हाण यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
तलाठी रोहित सिंग चव्हाण यांचे अफरातफरीचे अनेक प्रकरणे आहेत. मागील ६ महिन्यापासून मा. तहीलदार राईंचवार यांच्याकडे वारंवार तक्रार केली. मात्र, तहीलदार साहेबांनी कुठलीही कारवाही केली नाही. त्यामुळे या प्रकरणात त्यांचीही भूमिका संशयास्पद दिसून येते. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. हि आमची प्रामाणिक मागणी आहे.
प्रिया झांबरे युवा स्वाभिमानी पक्ष शहर महिला अध्यक्ष,

भूमाफियांचे घबाड बाहेर पडणार !

मागील अनेक दिवसापासून शहरात अवैध जमीन खरेदी विक्री’चा प्रकार सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अनेक बेकायदेशररित्या केलेल्या खरेदी विक्रीचे प्रकार समोर येतील. यामुळे भूमाफियांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

हे देखील वाचा ,

बालविवाह थांबविण्यास महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व पोलीस विभागाचे यश

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर बदली प्रकरणी अन्याय होणार नाही – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

खेलो इंडिया युवा स्पर्धा : अ‍ॅथलेटिक्स, जलतरणात पाच सुवर्णपदके खो-खो, टेनिसमध्ये महाराष्ट्राची आगेकूच

Comments are closed.