Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्र सरकारचा राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्या सायली आगवणे, वनिता बोराडे, कमल कुंभार यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. 7 मार्च  : केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाचा राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार’ महाराष्ट्रातील दिव्यांग कथ्थक नृत्यांगना सायली नंदकिशोर आगवणे, महिला सर्पमित्र वनिता जोगदेव बोराडे आणि उद्योजिका कमल कुंभार यांना जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी असलेला आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिला जाणारा मानाचा पुरस्कार तीन महाराष्ट्रकन्यांना मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला आहे. राजमाता जिजाऊँ, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या लेकी महाराष्ट्राच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा पुढे नेत आहेत, हे या पुरस्कारातून पुन्हा सिद्ध झालं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कार विजेत्यांचं कौतुक केलं आहे.

हे देखील वाचा :

राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

राज्यात 8 ते 12 मार्च दरम्यान महिला दिन सप्ताह – शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड

Comments are closed.