Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हा काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
  • काँग्रेस नेत्यांची सूडबुद्धीने केलेल्या ED चौकशी आणि अग्नीपथ योजनेचा केला निषेध.
  • लोकशाही ची हत्या करून हुकूमशाही प्रस्तापित करण्याचा केंद्र सरकारचा डाव – महेंद्र ब्राम्हणवाडे

गडचिरोली, दि. २० जून : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारकने सरकारी यंत्रणा हाताशी घेऊन अतिशय सूडबुद्धीच्या उद्देशाने अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी आणि काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्यावर ED कार्यवाही लावली. राहुलजी गांधी प्रमाणिकपणे चौकशी साठी  हजर राहत असताना देखील सतत चौकशी साठी त्यांना बोलावून मानसिक त्रास देण्याचा काम केंद्र सरकार करीत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

इतकेच नाही तर दिल्ली येथील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात पोलीस यंत्रणा पाठवून काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना मारहाण देखील केली. हे अतीशय लज्जास्पद कृत्य आहे. याचा निषेध म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आले.

केंद्र सरकार विरोधात जे  बोलतात त्यावर खोटे आरोप लावून त्यांना संपवण्याचा काम केंद्र सरकार करत आहे, त्यामुळे देशातील लोकशाही ची हत्या होत असून देशात हुकुमशाही चे राज्य निर्माण करण्याचा काम केंद्र सरकार करू पाहत आहे. असे मत जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ.चंदाताई कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, ता.अध्यक्ष नेताजी गावतुरे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, स्वयंम रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, सहकार सेल अध्यक्ष शामराव चापले, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, माजी जि.प.सदस्य कुसुमताई आलाम, स्वयंम रोजगार सेल कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष अपर्णा खेवले, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, सोशल मीडिया प्रदेश सचिव दिलीप घोडाम, माजी नगरसेवक रमेश चौधरी, प्रभाकर कुबडे, बाबुराव गडसुलवार, अनिल भांडेकर, गोपाल कविराज, वसंत राऊत, ज्ञानेश्वर पोरटे, दिलीप चुधरी, दुर्वास मेश्राम, भय्याजी मद्यमवार, माजीद सय्यद, विलास गोवारी,जावेद खान, भास्कर नरुले, कृष्णा झंजाळ, समीर ताजने, अब्दुल पंजवाणी, आशाताई मेश्राम, मंगलाई कोवे,हरबाजी मोरे, नीता वडेट्टीवार, आय. बी. शेख, डी. एन. रामने, अरुण पुण्यपरेड्डीवार, सुभाष धाईत, बडोपंत चितमलवार, नंदू कायरकर, नरेंद्र डोंगरे, निकेश कामीडवार, गुरुदास ठाकरे, लालाजी बावणे, अनिल गेडाम, परशुराम गेडाम, भास्कर बांबोळे, भैयालाल भिसें, लता मुरकुटे, कोवे सर, वामन पोरटे, कमलेश खोब्रागडे, गिरीश गोटेवार, राकेश रत्नावार, दिवाकर निसार, श्रीनिवास ताडपल्लीवार, ढिवरू मेश्राम, भुपेश कोलते, श्रीकांत भजभूजे, जितेंद्र मूनघाटे, मुकुंदा बावणे, मधुकर बावणे, वेदांत बावणे, मनोहर नवघडे, रामभाऊ नन्नावरे, संदीप भैसारे, पंढरी चौके, मयुर गावतुरे, गौरव एनपरेड्डीवार, कुणाल ताजने सह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते यावेळी आंदोलनात सहभागी होते.

हे देखील वाचा : 

हृदयद्रावक घटना: अंगावर वीज पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू…

नवनियुक्त राष्ट्रीय सचिव दिपक हिवरे यांचा वाहन चालक कर्मचारी संघटने मार्फत सत्कार..

 

Comments are closed.