Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खांडक्या’च्या नगरीत गुंड परप्रांतीयांचे साम्राज्य !

शहरात वाढती गुन्हेगारीमुळे स्थानिक नागरिकांचे पलायन; राजकीय इच्छाशक्तीची गरज..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बल्लारपूर दि.१७ :- कधीकाळी ‘खांडक्या बल्लाळशाहा’ राज्याने निर्माण केलेले हे शहर अलिकडे परप्रांतीय गुंडाच्या साम्राज्यात गेल्याचे चित्र एकामागून- एक अश्या वाढत्या घटना पाहून दिसून येत आहेत. गुन्हेगारीला जात, पंथ, धर्म जरी नसला तरी मात्र, तो एखाद्या विशिष्ट समुदायाभोवती फिरत असल्याचे मत स्थानिक नागरिकांच्या वतीने व्यक्त केले जात आहेत. एकीकडे शहराचा विस्तार जरी होत असला, तरी मात्र, स्थानिकांचे झपाट्याने होणारे पलायन हे या शहरासाठी चिंतेची बाब आहे. परिणामी, स्थानिक भूमिपुत्रांचे खरोखरचं रक्षण करायचे असेल, तर कुठेतरी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. ती फक्त निवडणूकीत मते मिळविण्यापुरतीचं राहू नये. अशी भावना स्थानिक नागरिकांच्या वतीने व्यक्त केली जात आहेत.

बल्लारपूर शहराला इतिहासिक वारसा लाभलेला आहे. ई. सं १४३७ ते १९६२ च्या कालखंडात बल्लारशाहा येथील प्राचीन किल्याची स्थापना झाली. तर या किल्ल्याचे शेवटचे शासक ‘राजे निळकंठशाहा’ हे होते. पुढे चंदा, चांदागड आणि आजचे चंद्रपूर या शहराची निर्मिती झाली. हा महान इतिहास सांगणाऱ्या किल्ला, आणि राणी हीराई यांची समाधीे शहरात आजघडीला साबुत आहे. एकीकडे हा गोंडकालीन वारसा जतन होत असला तरी मात्र, औद्योगिक पार्श्वभूमी असलेल्या शहरात रोजगारासाठी आलेले परप्रांतीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा औद्योगिक वारसा जतन करण्यात स्थानिक नागरिकांसोबत परप्रांतीयांचाही सिंहाचा वाटा आहे. हे आपण नाकारू शकणार नाही. मात्र, अलिकडे शहराची वाटचाल गुन्हेगारीकडे झपाट्याने होत आहे. हे वस्तुस्थिती पाहता दिसून येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अलीकडे शहरात चोरी, लुटमार, खून, छेडछाड अश्या गुन्ह्यात मोठी वाढ होत आहे. यावर अंकुश लावण्यासाठी पोलिस प्रशासन अहोरात्र राबत आहे. मात्र, यामध्ये परप्रांतीय गुंड प्रवृत्तीमोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीकडे कुठेतरी काणाडोळा करून चालणार नाही. यावर अंकुश लावायचे झाल्यास नागरिकांसह राजकीय इच्छाशक्तीचेहि मोठे पाठबळ मिळायला हवे, हेही इतकंचं खर आहे. अन्यथा या शहरात येत्या काळात सर्वसामान्य भूमिपुत्र नागरिक पाहायलाही मिळणार नाही. अशी चिंता स्थानिक नागरिकांच्या वतीने व्यक्त केली जात आहे.

शहराचा विस्तार मात्र, नागरिकांचे पलायन.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

२०११ च्या जनगणने नुसार शहराची लोकसंख्या ८९ हजाराची असल्याची नोंद आहे. मात्र, आज घडीला शहराची लोकसंख्या लाख ते सव्वा लाखाच्या जवळपास आहे. या तुलनेत शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या तुलनेत लोकसंख्येत मात्र, विशेष वाढ झाल्याचे पाहायला मिळाले नाही. त्याचं नेमकं कारण म्हणजे, सुशिक्षित वर्गाचं होणार शहरातून पलायन असल्याचं वर्तविले जात आहे. मागिल पाच ते सहा वर्षात सर्वात महागड्या अश्या उच्चभ्रू वस्ती समजली जाणारी एकट्या बालाजी वार्डातून सुमारे तीनशे ते पाचशे स्थानिक नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेरगावी इतेरत्र पलायन केले आहेत. हीच परिस्थिती कमी जास्त प्रमाणात शहरातील ईतर वार्डातील आहे. हि बाब चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.

गुन्हेगारीत वाढ झालेली वस्त्या 
तिलक वार्ड, भगतसिंग वार्ड, सरदार पटेल वार्ड, गोकुल नगर वार्ड, पंडित दीदयाल वार्ड, बि.टी.एस प्लॉट अश्या शहरातील ६ वार्डात गुन्हेगारी अलिकडे वाढली आहे.
राजकीय पक्षांचा पुढाकार गरजेचा..

राजकीय पक्षांमध्ये गुंड प्रवृत्ती वाढल्याची बाब चिंताजनक आहे. सुरक्षित आणि भयमुक्त शहर ठेवण्यासाठी राजकीय पुढाकार हवा आहे.

एखाद्या समाजामध्ये सुरक्षेचा प्रश्न जेव्हा मोठा होतो, सामान्य नागरिकांना जिथे सुरक्षित वाटत नाही, तिथे प्रश्न हा पोलिसांचा नसून त्या समाजाच्या एकूणच स्वास्थ्याचा आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. समाजाच्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे बघताना समाजाची वीण अधिक घट्ट कशी होईल आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच कशी कमी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
बल्लारपूर शहराचे आज तेच झाले आहे. शहर भयमुक्त आणि सुरक्षित बनवायचं असेल तर सध्याच्या परिस्थितीमध्ये काही मूलभूत बदल करण्याची गरज आहे.

संतोष आत्राम
सामाजिक कार्यकर्ते, बल्लारपूर.

गुंडांच्या मुसक्या आवळून सुरक्षित आणि भयमुक्त शहर ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन सदैव तत्पर आहे. नागरिकांची साथ हवी.! 

पोलिस निरीक्षक, बल्लारपूर
(उमेश पाटील)

हे देखील वाचा ,

राज्यातील पहिली गोंडी भाषिक शाळा गडचिरोलीच्या मोहगाव येथे सुरू

महाराष्ट्राचा २०२२-२३ चा ५ लाख ४८ हजार ४०७ कोटी ५२ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर

 

Comments are closed.