Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“त्या” दोन अवैध अतिक्रमित धारकांचे वन्यजीव विभागाने काढले अतिक्रमण!

मार्कंडा (कं) येथे वनाधिकाऱ्यांची कारवाई.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आलापल्ली वनविभागात उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलीया यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वनविभागात अवैध अतिक्रमण, वन्यप्राण्यांची शिकार, सागवान तस्करी, अवैध उत्खनन या सर्व बाबीकडे प्रकर्षाने लक्ष केंद्रित केल्याने तस्करांचे, अतिक्रमण धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. यामुळे त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना डोळ्यात तेल घालून राहावे लागत आहे. केव्हा उप वनसंरक्षक दौरा करतील आणि कोणती कारवाई करतील हे कळत नसल्याने कर्मचाऱ्यांतही धास्ती दिसून येत आहे.  

गडचिरोली,  दि. २७ डिसेंबर : वन्यजीव विभाग आलापल्ली मध्ये मोडत असलेल्या चौडमपल्ली वनपरिक्षेत्रात असलेल्या आलापल्ली-चंद्रपूर महामार्गवर असलेल्या मार्कंडा (कं) पासून मुलचेरा जाणाऱ्या मार्गाच्या चौकात वन्यजीव वनक्षेत्रात मोडत असलेल्या जागेवर अशोक राबिन मंडल, गोपाल नारायण चक्रवर्ती यांनी अवैधरित्या जागा अतिक्रमण करून चहा टपरीचे दुकान चालवीत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर जागा वन्यजीव वनपरिक्षेत्रातील असल्याने ही बाब वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने चहा टपरी चालविणाऱ्याची चौकशी करून सदर जागा वनातील असूनही अतिक्रमण धारकांना दस्तावेज पुरावा सादर करण्यासाठी वेळोवेळी नोटीस देऊन संधी देण्यात आली. मात्र अतिक्रमण धारकांनी वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटीसला केराची टोपली दाखविली. तरीसुद्धा राहुल सिंह टोलीया, उपविभागीय वनाधिकारी, वन्यजीव आलापल्ली यांनी माणुसकीच्या दृष्टीकोनातून वनातील अतिक्रमण निर्मुलन संदर्भात पुनश्चः नोटीस देण्यात आली.

त्यावेळी अवैध अतिक्रमण धारकांनी क्षेत्रसंचालक ताडोबा यांच्याकडे अपील करण्यात आले. मात्र अतिक्रमण धारकांनी दिलेले अतिक्रमित जागेच्या मालकी हक्काचे पुरावे सादर करू शकले नसल्याने शेवटी अतिक्रमण धारकाचे अपील फेटाळण्यात आले. अतिक्रमण धारक अतिक्रमित केलेली जागा सोडण्यास तयार नसल्याने कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय वनाधिकारी राहुल सिंह टोलीया यांनी आष्टी पोलीस ठाणे यांना तक्रार देऊन घटनास्थळी पोलीस तैनात केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याशिवाय सदर कारवाईसाठी चौडमपल्लीचे वन्यजीव वनपरिक्षेत्राधिकारी गणेश लांडगे, मार्कंडा (कं) वनपरिक्षेत्र, अहेरी वनपरिक्षेत्रातील वनाधिकारी व वनकर्मचारी सामील करण्यात येऊन सदर अतिक्रमित केलेले चहा टपरीचे दोन्ही दुकान हटविले आहे. त्यामुळे सध्या वनविभागाच्या धाडसी कारवाईने अतिक्रमण धारकात चांगलीच भीती निर्माण झाली आहे.

हे देखील वाचा : 

मोठी बातमी : पोलीस जवान आणि नक्षल्यांत चकमक; चकमकीत ६ नक्षल्यांचा खात्मा

गावात शिरून बिबट्याने केली गायीची शिकार; गावकऱ्यामध्ये दहशत

शिवसेना आमदार तानाजी सावंत बंडखोरीच्या तयारीत! मुख्यमंत्री ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष..

 

 

Comments are closed.