Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जंगली हत्तीकडून पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मिळेल मोबदला : वनक्षेत्रपाल अरूप कन्नमवार

अरूप कन्नमवार वनक्षेत्रपाल म्हणून पदभार स्वीकारताच हत्तीने नुकसान केलेल्या शेतशिवारात दौरा करून केली पाहणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नवनियुक्त वनक्षेत्रपाल अरूप कन्नमवार रुजू होताच हत्तींकडून झालेल्या नुकसानीचे पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद केल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले असून झालेल्या नुकसानीचा मोबदला योग्य लवकरात लवकर मिळवून देतील. त्यासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  

दोडामार्क, दि. १९ मे : येथे वनपरिक्षेत्रात अरूप कन्नमवार यांनी पदभार स्वीकारून मोर्ले परिसरात जंगली हत्तींनी नुकसान केलेल्या क्षेत्राची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावरून लवकरात लवकर मोबदला मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रत्यक्ष भेटीदरम्यान शेतकऱ्यांना आश्वासित केले.

मोर्ले परिसरात गेल्या काही दिवसापासून तस्कर नावाच्या नर हत्तीसह एक मादी व तीन हत्तीचे पिल्लू मार्गक्रमण करीत असतांना शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात जाऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अशातच वनविभागात नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून रुजू झालेले कन्नमवार यांना माहिती प्राप्त होताच घटनास्थळ गाठून घटनेचे गांभीर्य ओळखून शेतकऱ्यासह संवांद करून मोका पंचनामा करून शासनस्तरावरून लवकरात लवकर मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे शेतकऱ्यांना बोलून दाखविले आहे.

दरम्यान पाच हत्तींकडून शेतकऱ्यांची मोठमोठी नारळाची झाडे तसेच इतरही पिक जमीनदोस्त झाली आहेत. हत्ती दिवसा आणि रात्री गावाच्या आसपास वावरत असल्याने गावकरी चिंताग्रस्त आहेत. दोन दिवसापासून मोर्ले परिसरात हत्तीचा सहवास असल्याने शेतकरी चिंतामग्न असून वनकर्मचारीही हत्तींना कसे वापस पाठविता येईल यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. तर दुसरीकडे मोर्ले परिसरातील नागरिकांना हत्तींना कुणीही त्रास देण्याचा प्रयत्न करू नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष मोर्ये, उपसरपंच पंकज गवस, गणपत मोयें. रमेश गवस, सत्यवान बेर्डे बाळा देसाई आदी उपस्थित होते. त्यांनी हत्तींच्या कळपाचा उपद्रव आणि शेतकऱ्यांची भयावह अवस्था तसेच नुकसान भरपाईचे निकष बदलण्याची गरज याबाबत कन्नमवार यांच्याशी चर्चा केली.

यावेळी वनपाल शिरवलकर, वनकर्मचारी कुडल आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षाचा कारावास; 1987 च्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने सुनावली शिक्षा

यांत्रिकीकरणाऐवजी मानवीकरणावर भर दिल्यास उत्तम निवडणूक व्यवस्थापन शक्य : प्रो. रजनीश कुमार शुक्ल

माजी जि.प. सदस्या विजयाताई विठ्ठलानी यांचा शिवसेनेत प्रवेश 

 

 

Comments are closed.