Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे ‘आयआयएम’ सोहळ्यासाठी आज नागपूरात आगमन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नागपूर, दि. ७ मे : मिहान परिसरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ( आयआयएम ) नागपूरच्या नव्या इमारतीचे उद्घाटन उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.त्यासाठी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे सायंकाळी ६ वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले.

मिहान परिसरातील ‘आयआयएम’च्या नव्या कॅम्पसचे सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यास ते उपस्थित राहतील.
आज विमानतळावर त्यांचे विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी स्वागत केले.

हे देखील वाचा : 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते होणार माडीया सांस्कृतिक महोत्सव 2022 चे उद्घाटन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पुस्तकाच्या गावाला भेट !

 

Comments are closed.