Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली, 14,ऑक्टोबर :- हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या १२ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशात मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. हिमाचल प्रदेशात केवळ एका टप्प्यात निवडणुका होणार असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. दरम्यान, आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या नाहीत. या तारखा दिवाळीनंतर घोषित केल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. हिमाचल प्रदेशात एकूण ५५९७२६१ मतदार आहेत. त्या पुरुष मतदार २७८०२०८ तर महिला मतदार २७२७०१६ आहेत. तर सर्व्हिस मतदार ६७५३२ पीडब्ल्यूडी मतदार ५६००१, बुजुर्ग मतदार १२२०८७ आहेत. तर पहिल्यांदा मतदान करणारे १८६६८१ मतदार असल्याचं राजीव कुमार यांनी सांगितलं.आपला उमेदवार कोण आहे?  त्याची माहिती काय आहे हे मतदारांना माहिती मिळावे म्हणून सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येणरा आहे. उमेदवारांची माहिती जाणून घेण्याचा सर्व नागरिकांना अधिकार आहे. उमेदवारांना प्रचारादरम्यान तीन वेळा वर्तमानपत्रं आणि टीव्ही चॅनेलवर आपल्याबाबतची जाहिरात द्यावी लागणार आहे, असं निवडणूक आयोगाने सांगितलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काही पोलिंग बुथची सूत्रे महिलांच्या हाती दिली जाणरा आहेत. घरातून पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा अधिकार दिला जाणार आहे. मतदान करण्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. सहाय्यक आणि व्हिलचेअरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय पिक अँड ड्रॉपची सुविधाही दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व मतदान केंद्र सुरक्षित आणि सहज ठेवले जाणार आहेत. सर्व मतदान केंद्र तळमजल्यावरच असतील. पाणी, वेटिंग शेड, टॉयलेट आणि विजेची सुविधाही असणार आहे, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धान विक्री करीता शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरु.

Comments are closed.