Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एखादा निर्णय घेतल्यानंतर कारण नसताना गैरसमज निर्माण होत असतील तर तो निर्णय थांबवला जाऊ शकतो – अजित पवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई दि. ३१ मार्च : आमदारांना घरे देण्याच्या निर्णयावरुन मिडियामध्ये विरोधात बातम्या आल्या मात्र आमदारांना मोफत घरे दिली जाणार नाहीत. ठरलेल्या किमतीत घरे दिली जाणार होती मात्र आता एखादा निर्णय घेतल्यानंतर कारण नसताना गैरसमज निर्माण होत असतील तर तो निर्णय थांबवला जाऊ शकतो असे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले.

आमदारांच्या घरांचा मुद्दा आज माध्यमांनी विचारला असता अजित पवार यांनी कदाचित हा निर्णय रद्द होऊ शकतो असे स्पष्ट केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

३०० आमदारांना घरे देण्याचा निर्णय जाहीर झाल्यावर जनतेला ती मोफत घरे देणार असे वाटले वास्तविक तो मोफत देण्याचा निर्णय नव्हता असेही अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना त्यावेळी अधिकार होते १० टक्के तातडीची गरज म्हणून लोकप्रतिनिधींना, खेळाडू, कलाकारांना घरे देण्याचा मात्र त्यानंतर ५ टक्के झाले होते. आता तर ते कोर्टात प्रकरण आहे. आमदारांना देण्यात येणार्‍या घरांची चर्चा सोशल मिडिया, मिडिया यामध्ये चांगलीच रंगली आणि माध्यमातून विरोधात बातम्या लावण्यात आल्या. त्याचवेळी पवारसाहेबांनी घरांबाबत स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे तीच राष्ट्रवादीची असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ठरलेल्या किमतीत घरे देण्याचा प्रयत्न होता परंतु आता लोकांचा विरोध असेल तर कदाचित हा निर्णय होणार नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा : 

गेल्या ५० वर्षात चंद्रपुरात प्रथमच मार्च महिन्यात एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद

आलापल्ली चे खेळाडू चमकले राष्ट्रीय पातळीवर

 

 

Comments are closed.