Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मिरा-भाईंदर मधील पहिल्या वॉकिंग प्लाझाचे उदघाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मिरा-भाईंदर, दि. ७ ऑक्टोंबर :  मिरा-भाईंदर शहरातील आरोग्यप्रेमी नागरिकांसाठी पहिल्या वॉकिंग
प्लाझाचे उद्घाटन नुकतेच शानदारपणे पार पडले.

मिरा-भाईंदर शहरातील राधास्वामी सत्संग परिसर या भागात दररोज सकाळी नागरिक मोठया प्रमाणात वॉकींग करण्यासाठी येत असतात. राधास्वामी सत्संग परिसरातील सुभाषचंद्र बोस मैदानाजवळील सार्वजनिक शौचालय ते शहा आगार पर्यंतच्या सत्संग
बाजूकडील रस्ता या ठिकाणी वॉकींग प्लाझा बनवून त्याची अंमलबजावणी व्हावी याकरिता स्थानिक नागरिक, नगरसेवक मागणी करित होते. त्याअनुषंगाने आरोग्यप्रेमी नागरिकांच्या भावना लक्षात घेवून मिरा-भाईंदर महानगरपालिका व शहर वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राधास्वामी सत्संग मैदानाच्या बाहेरील बाजूने असणा-या रोडवर दिनांक ०५/१०/२०२२ रोजी शहरातील पहिल्या वॉकींग प्लाझाचे उद्घाटन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर ठिकाणी सकाळी ६:०० ते ८:०० वाजेपावेतो नागरिकांना चालण्यासाठी वॉकींग प्लाझा वापरता येणार आहे. मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या दुस-या वर्धापन दिनानिमित्त दिनांक १/१०/२०२२ ते ७/१०/२०२२ पावेतो पोलीसांकडून विशेष सप्ताह राबविण्यात येत असून सदर मोहिमेअंतर्गत उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

उपरोक्त वॉकींग प्लाझाच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी दिलीप ढोले, आयुक्त-मनपा, मिरा-भाईंदर, विजयकांत सागर, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय), विनायक नरळे, सहा पोलीस आयुक्त (मुख्यालय), शांतीलाल जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक मुकूटलाल पाटील, रमेश भामे इतर पोलीस अधिकारी अंमलदार व आरोग्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.

हे देखील वाचा :

शिंदेंच्या नातवाविषयी केलेल्या टिकेबाबत फडणवीस व्यथित

स्मिता-जयदेव ठाकरेंवर कीर्ती फाटक यांचा हल्लाबोल

 

Comments are closed.