Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुरजागड लोहखदानीच्या अवजड वाहतुकी विरोधात व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद सुरूच…

सलग तिसऱ्या दिवशीही बाजारपेठ संपूर्ण बंद आहे, जनजीवन विस्कळित...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 14, सप्टेंबर :- सुरजागड लोह खदानीच्या अवजड वाहतुकीमुळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या धुळीमुळे त्रस्त झाल्याने आलापल्ली येथील व्यापाऱ्यांसह नागरिकांनी शासनाच्या निषेधार्थ बेमुदत बंद पुकारला आहे. याबाबत व्यापारी संघटना आणि सुरजागड लोह खदानीचे अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी यांच्या सोबत तब्बल दोन तास बैठक झाली. मात्र तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली. आज दुसऱ्या दिवशी देखील व्यापाऱ्यांचा हा बेमुदत बंद सुरूच आहे.

अल्लापल्लीतील बाजारपेठ, बंद असलेली दुकाने, चहाच्या टपरी पासून ते, हॉटेल व्यवसायिक, भाजी विक्रेते, किराणा व्यवसायिक, डॉक्टर आणि फार्मसी सुद्धा बंद याचे कारण येथे कोणता कर्फ्यु किंवा लॉक डाऊन नाही…हा सुरजागड लोह खदानीच्या अवजड वाहतुकीमुळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या धुळीमुळे त्रस्त झाल्याने आलापल्ली येथील व्यापाऱ्यांसह नागरिकांनी
शासनाच्या लोह खादान कंपनी धार्जीण्या भूमिकेच्या निषेधार्थ स्वयंस्फूर्तीने केलेला बेमुदत बंद आहे. याबाबत व्यापारी संघटना आणि सुरजागड लोह खदानीचे अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सोबत तब्बल दोन तास बैठ झाली. मात्र कोणताच तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली आणि आज दुसऱ्या दिवशी देखील व्यापाऱ्यांचा हा बेमुदत बंद कडकडीत सुरू आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

व्यापाऱ्यांसह नागरिकांनी केलेल्या मागण्या –

१) बायपास रस्ता ३ महिण्यात तयार करावा.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

२) बायपास रस्ता तयार होईपर्यंत सुरजागड येथील लोह खनिज वाहतूक रात्री १०.०० ते सकाळी ५.०० पर्यंतच सुरू ठेवावी.

३) सर्व लोह खनिज वाहतूक करणाऱ्या गाडया क्षमतेनुसार भरावे, ओव्हरलोड भरू नये.

४) एटापल्ली ते आष्टी पर्यंत रस्ता त्यांच्या गाड्यांचे लोड सांभळु शकेल असा मजबुतीकरण तात्काळ करावे.

५) लोह खनिज वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर ताडपत्री लाऊन झाकणे, जेणेकरून धूळ मातीची समस्या निर्माण होणार नाही.

व्यापाऱ्यांसह नागरिकांनी केलेल्या या मागण्यांवर तब्बल दोन तास चर्चा झाली, परंतु या मागण्या शासन किंवा सुरजागड खाण कंपनीचे अधिकारी मान्य करण्यास तयार नाहीत. आणि व्यापारी संघटना देखील आपल्या रास्त मागण्यांबाबत समझोता करण्यास तयार नाहीत त्यामुळे हे बेमुदत बंद आंदोलन चिघळणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सुरजागड लोह प्रकल्पातून ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या शेकडो ट्रकमुळे एटापल्ली ते आष्टी महामार्गावर मोठ मोठाले जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर रोजच अपघात होत आहेत. शिवाय ट्रक वर कोणतेही आवरण न टाकता लोहखनिजाची उघड्यावर वाहतूक केल्या मुळे प्रचंड धुळीची समस्या निर्माण झाली आहे. या विरोधात परिवहन विभाग मात्र कोणतीही कारवाई करत नाही. या अनुषंगाने वर्षभरापासून कित्येक तक्रार देउनही कारवाई झाली नसल्याने शेवटी व्यापारी संघटनेच्या वतीने चक्क परिवहन अधिकारीच हरवल्याची तक्रार पोलिसात दखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

एकंदरीत गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह खनिज प्रकल्प आता वेगवेगळ्या कारणांनी वादात सापडत आहे. काही दिवसांपूर्वीच लोह खाणीतील गाळामुळे नुकसानग्रस्त आदिवासी शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या असंवेदनशील वर्तणुकीमुळे व्यथित होऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आता रस्त्याची दुरावस्था आणि त्यामुळे धूळ आणि अपघातांच्या समस्यांमुळे त्रस्त झालेल्या व्यापारी आणि नागरिकांनी बेमुदत बंदचे हत्यार उगारले आहे. यामुळे नेहमीच लोहखाण कंपनीची बाजू उचलणाऱ्या प्रशासनासह, सुरजागड खाण कंपनी विरोधात नागरिकांचा रोष वाढताना दिसत आहे. त्यामुळे सुरजागड प्रकल्पाच्या बाबतीत पीडित व्यापारी आणि नागरिकांना न्याय मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा :-

लम्पी आजाराबाबत संबधितांनी सतर्कता बाळगून नियमांचे पालन करावे – जिल्हाधिकारी गडचिरोली

Comments are closed.