Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्र सरकारच्या पोषण अभियानांतर्गत पोषण पंधरवडा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत साजरा!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

मुंबई, दि. २६ मार्च : केंद्र सरकारच्या पोषण अभियानांतर्गत पोषण पंधरवडा आज कांदिवलीच्या पावनधाम येथे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. पोषण पंधरवड्यानिमित्त ३०० अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी पोषणयुक्त अन्न धान्य आणि खाद्यान्न यांचे प्रदर्शन आयोजित केले.  यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी मीनाक्षी बिराजदार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सांगून पोषण प्रतिज्ञा घेतली.

यावेळी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते आंगणावडी सेविका आणि पोषक मुलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सहभागी सर्व सेविका मदतनीस आणि अधिकाऱ्यांचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी कौतुक केले.

‘जे अजून ही कुपोषित असतील त्या मुलांना शासन योजनेतून जे काय पोषण खाद्य मिळतात ते असू दे. परंतु काही कमी पडल्यास मी स्वतः जातीने लक्ष घालून त्यात मदत करायला तयार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज कुपोषणावर नाही, तर पोषण पंधरवड्यावर कार्यक्रम होत आहे,’ असे खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी प्रकल्प अधिकारी अब्दुल चौधरी, मीनाक्षी बिराजदार, पोषक आहार तज्ञ डॉ.रेश्मा सिधे आदी उपस्थित होते.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

रशियन सैनिकांचा बंड; आपल्याच कर्नलला रणगाड्याखाली चिरडून मारलं

धक्कादायक! तरुणाची निर्घृण हत्या!

महिला स्वतः सक्षम होऊन दुसऱ्यांना सक्षम करतात – डॉ. संपदा नासरी

 

 

Comments are closed.