Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कवटाराम-कापेवंचा जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूच्या शोध मोहिमेबाबत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 28 फेब्रुवारी : सर्व जनतेला कळविण्यात येते की, उपपोलीस स्टेशन, राजाराम (खांदला) तालुका अहेरी, जिल्हा गडचिरोली अंतर्गत, पोलीस पथक नक्षल शोध मोहिम राबवित असतांना, कवटाराम- कापेवंचा जंगल परिसरात पोलीस व नक्षल यांच्यात दिनांक 23.07.2017 रोजी झालेल्या गोळीबारात एक पुरुष अनोळखी ईसम मृत्यू झालेला होता.

सदर अनोळखी मृतकाचे दंडाधिकारी तपास व चौकशी प्रक्रिया, उपविभागीय दंडाधिकारी अहेरी यांचे न्यायालयात सुरु असून वरील घटनेच्या संबंधात ज्या व्यक्ती यांना निवेदन/ प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आहे. त्यांनी ही प्रेस नोट प्रसिद्ध झाल्याचा दिनांकापासून 20 दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी, अहेरी यांचे न्यायालयात स्वत: उपस्थित राहुन कार्यालयीन वेळेत सादर करावे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटनेसंबंधी माहिती देणाऱ्या व्यक्तीबाबत, त्यांचे विनंतीनुसार गोपनियता बाळगणेत येईल याची नोंद घ्यावी, असे अहेरीचे  सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अंकित यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती

पंचगंगा नदीपात्रात हजारो मृत माशांचा मोठा खच…

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.