Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिंदे गट दसरा मेळावा हायजॅक करणार?

सस्पेंस कायम !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. २८ ऑगस्ट :  दरवर्षी शिवसेनेतर्फे दरवर्षी दसरा साजरा केला जातो. याच दसरा मेळाव्यातून स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजीपार्क वर शिवसैनिकांना सोबत विचारांचे सोने लुटले. याच मेळाव्यात शिवसेनेच्या व्यासपीठावर शरद पवार, जॉर्ज फर्नाडिस, भय्यासाहेब आंबेडकर आदी दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यावर्षीच्या दसरा मेळाव्याकडे जनता वेगळ्या अँगलने पाहते आहे. कारण यावेळच्या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे यावर्षीच्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट शिवाजी पार्कच्या मैदानासाठी मुंबई महानगरपालिकेकडे परवानगी मागण्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान ठाकरे गटाने मेळाव्याची परवानगी मिळावी म्हणून महानगरपालिकेकडे अर्ज केला आहे. तर आमचा दसरा मेळावा होईलच असे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. तर दादर – माहीम मतदार संघातील शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी म्हटले आहे की दरवर्षी परवानगीसाठी मीच पत्र देत असतो.पण मी अद्याप पत्र न दिल्याने महानगरपालिकेने परवानगी दिलेली नसावी. शिंदे गट मेळाव्यासाठी अर्ज करणार का नाही हा सस्पेंस मात्र कायम आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

क्रीडापटूची सतर्कतेमुळे फसवणूक टळली; अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल

रोहित पवारांच्या अडचणीत वाढ ?

 

 

Comments are closed.