Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अधीक्षक अभियंता पुंडलीक थोटवे यांना स्वयंदीप सन्मान जीवन गौरव पुरस्कार प्रदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी थोटवे यांना मानपत्र, सन्मानचिन्ह व म.फुले यांची पगडी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमात प्रास्ताविकात स्वयंदीप फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ. बबन जोगदंड यांनी या पुरस्कारामागची भूमिका सांगितली व थोटवे यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला

पुणे,दि.१४ डिसेंम्बर : स्वयंदीप फाउंडेशन,पुणे यांच्यावतीने मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता पुंडलीक थोटवे यांना स्वयंदीप सन्मान जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्वयंदीप फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी सामाजिक,प्रशासकीय, जलसिंचन क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना “स्वयंदीप सन्मान जीवन गौरव” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या वर्षी या पुरस्कारासाठी मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पुंडलिक थोटवे सर निवड करण्यात आली होती. या पुरस्काराचे वितरण पुण्यात हॉटेल क्लार्क इन येथे एका शानदार समारंभात करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख अतिथी म्हणून ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत, लेखक डॉ.श्रीपाल सबनीस तर प्रमुख पाहुणे म्हणून,पुणे विभागाचे अतिरिक्त महसूल आयुक्त अनिल रामोड, राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, यांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता मिलिंद जीवने ,मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार लोकसत्ताचे सहयोगी संपादक मधू कांबळे नांदेड येथील प्रसिद्ध लेखक, साहित्यिक डॉ. राम वाघमारे व यशदातील अधिकारी डॉ. बबन जोगदंड उपस्थित होते.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी थोटवे यांना मानपत्र, सन्मानचिन्ह व म.फुले यांची पगडी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमात प्रास्ताविकात स्वयंदीप फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ. बबन जोगदंड यांनी या पुरस्कारामागची भूमिका सांगितली व थोटवे यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी बोलताना प्रसिद्ध विचारवंत श्रीपाल सबनीस यांनी हा पुरस्कार एका सद् विचारी माणसाला देऊन त्यांचा सन्मान केला आहे, असे सांगून लोकशाही मूल्य पेरणारा व डोळस, ध्येयवादी अभियंता असे थोटवे यांचे वर्णन केले.
कार्यकुशल अधिकारी अशी त्यांची ओळख आहे त्यांनी कामाला ,श्रमाला जात-धर्म नसते हे दाखवून दिले नांदेडे यांनी थोटवे यांचा जीवनप्रवास संघर्षमय होता. यातून त्यांनी वाट काढून प्रशासकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. असे सांगितले.

रामोड यांनी थोट यांचे काम अलौकिक स्वरूपाचे असून त्यांनी वंचित घटकातून येऊन जलसंपदासारख्या क्षेत्रात भरीव योगदान देऊन आपल्या कार्याचे वेगळेपण सिद्ध केले आहे म्हणूनच त्यांनी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे असे सांगितले. मधू कांबळे यांनी जलसंपदा क्षेत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मौलिक योगदान होते,असे म्हटले.

यावेळीऔरंगाबाद येथील दैनिक आधुनिक केसरी या वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या त्यांच्यावरील गौरवअंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात कीर्ती देसाई यांनी स्वागतगीत गायले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा कल्याणकर यांनी तर आभार दिलीप पवार यांनी मानले. समारंभाला विविध क्षेत्रातील निवडक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

हे देखील वाचा,

क्रिकेटपटू रोहित शर्मा झाला अलिबागकर

दिवसाढवळ्या भररस्त्यात तरुणाची केली निर्घुण हत्या! 

महाराष्ट्र विधान परिषद नागपूर प्राधिकारी मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी घोषित

बिबट्याच्या चामड्याची तस्करी करताना चौघांना अटक; एक फरार

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच नेचर सफारी चे उदघाटन

Comments are closed.