Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण अपघात! दोन दुचाकीची समोरासमोर धडक, धडकेत दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

जालना, दि. ७ एप्रिल : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वलखेडा पाटीजवळ दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी 11.30  वाजेच्या सुमारास घडली आहे.

अनिल राजाराम मिस्तरी (45) व रशिद जान महंमद शेख (60 ) मयताची नावे आहेत. रशिद शेख हे हिरो कंपनीची ड्रीमयुगा क्र. MH-21-BJ-8393 दुचाकीवरुन अंबड कडुन त्याच्या गावी कुंभार पिंपळगाव कडे जात असतांना वलखेडा पाटीजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहच्या काही अंतरावर त्यांच्या विरुद्ध दिशेने अनिल मिस्तरी हा त्याची हिरो होंडा कंपनीची दुचाकी MH-21-J-6902 ही घेऊन घनसावंगीकडुन अंबड कडे येत होता. तेव्हा दोन्ही दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाल्याने दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झालेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अपघातात मृत झालेल्याचे मृतदेह अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची अंबड पोलीसात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्काराकरीता अर्ज आमंत्रित

6 ते 16 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.