Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदीवासिंची परंपरा,संस्कृती टिकण्यासाठी पारंपरिक नाच गाणे मेळावे गरजेचे . विवेक पंडित

आदिवासी नृत्य, मेळावा उसगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आदिवासिंची परंपरा आणि संस्कृती टिकून राहीली पाहिजे यासाठी असे पारंपारिक नाच गाणे, मेळावे होने गरजेचे आहे . ” या नाच, गाणे मेळाव्यात लोक हौशेने येतात, त्यांना ते हवे असते हेच दिसले’. असे मत विवेक पंडित यांनी व्यक्त केले .त्यामुळे या मेळाव्याचे नियोजन करणाऱ्या आणि त्याला साथ देणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.

पालघर,दि ३१ ऑक्टोबर : नव्या पिढीने आदिवासींचा सांस्कृतिक ठेवा जतन करून ठेवावा, तरुणाईला आपले पारंपरिक नृत्य कला माहिती व्हावी आणि नृत्याचा आनंद लुटत सर्वांनी एकत्र यावे. यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने उसगाव डोंगरी येथे नाच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या मेळाव्यात, ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी बांधवानी मोठ्या उत्साहात आपले पारंपरिक नृत्य सादर केले.संघटनेचे संस्थापक, विवेक पंडित, अध्यक्ष राम वारणा, ज्येष्ठ वकील ऍड सुरेश कामत,ऍड. दिगंबर देसाई, डॉ. आशिष आणि वर्षा भोसले, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा नाच मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पूर्वी आदिवासी लोक दिवसभर मेहनत करून, कामावरून थकून आल्यावर कामाचा शिण घालवण्यासाठी गौरी नाच, ढोल नाच, तारपा नाच, चवळी नाच, डब्बा नाच, मोरघा नाच असे वेगवेगळ्या भागात प्रचलित असलेले पारंपरिक नाच नाचत असत. आता ही संस्कृती आणि पारंपरिक नृत्य आणि लोककला लोप होण्याच्या मार्गावर आहेत.

या संस्कृतीचे जतन करण्यासाठी उसगाव येथे दरवर्षी नाच,गाणे मेळाव्याचे आयोजन केले जाते. परंतु कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील वर्षी हा मेळावा होऊ शकला नाही. त्यामुळे यंदाच्या मेळाव्यात तरुणाचा जोश काही वेगळाच होता. विशेषः महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

आदिवासिंची परंपरा आणि संस्कृती टिकून राहीली पाहिजे यासाठी असे नाच मेळावे होणे गरजेचे आहे असे मत विवेक पंडित यांनी व्यक्त केले. तसेच “या नाच मेळाव्यात लोक हौशेने येतात, त्यांना ते हवे असते हेच दिसले’. त्यामुळे या मेळाव्याचे नियोजन करणाऱ्या आणि त्याला साथ देणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.

हे देखील वाचा,

अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची भाऊबीज भेट – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

रिक्त पदे भरण्याबाबत कालबध्द आराखडा तयार करावा – वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

Comments are closed.