Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

युवकाचा वारी हनुमानच्या डोहात बुडून मृत्यू .!

पोहण्यासाठी जाणाऱ्या युवकांचा दरवर्षी होतो येथे मृत्यू...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बुलढाणा दि,२७ जुन  : जिल्ह्यातील वारी हनुमान येथील नदीवर असलेल्या डोहात शेगाव शहरातील  ३० वर्षीय युवकाचा डोहात  बुडून मृत्यू  पावल्याची घटना सायंकाळी उघडकीस आली आहे. इकबाल शाह सत्तार शाह असे मृत्यू  पावलेल्या युवकाचे नाव आहे. दरवर्षी या ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या युवकांचा या डोहात बुडून मृत्यू होत असतो. मात्र अजूनही प्रशासनाकडून या ठिकाणी कुठलीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केली नसल्याने येथे असे अपघात होत असल्याचं बोलल्या जात आहे..

या डोहात बुडालेला हा युवक एका वाहनावर चालक म्हणून काम करतो. वारी हनुमान येथे एका कार्यक्रमासाठी वाहन घेऊन गेला होता यावेळी तो अंघोळ करण्यासाठी तो वान आणि आड नदीच्या संगमा नजीक असलेल्या डोहात उतरला होता. यात तो डोहातील कपारीत अडकल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. हि बाब नजीकच्या  नागरिकांच्या लक्षात येताच मदतीने युवकाचे मृतदेह बाहेर काढण्यात आला असून घटनास्थळी  सोनाळा पोलिसांच्या मदतीने वरवट बकाल येथे शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात  आले  आहे . सदर घटनास्थळ हे बुलढाणा जिल्ह्यात येत असल्याने त्यांनी सोनाळा पोलिसांनी याबाबत कारवाई करीत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

   हे देखील वाचा,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मास्टर स्ट्रोक : बंडखोर शिवसेना मंत्र्यांची मंत्री मंडळातून केली हकालपट्टी..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.