Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

किक बाॅक्सिंगमध्ये चॅम्पियन बनला अर्थव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहमदनगर, 14 नोव्हेंबर :- नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय किक बाॅक्सिंग मध्ये नगरच्या अथर्व साळे ने उत्तम कामगिरी करत सुवर्णपदक प्राप्त केले. वर्ल्ड असोसिएशन ऑफ किक बाॅक्सिंगच्या वतीने दिल्ली येथील तालकोट स्टेडीयमवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अर्थव ची लढत जोर्डनच्या खेळाडू सोबत झाली. दरम्यान अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करत अर्थव ने सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

स्पर्धेत भारतासह जोर्डन, साउथ कोरिया, जर्मनी या देशांचा समावेश होता. या स्पर्धेत 17 ते 18 वयोगटातील 81 किलो पेक्षा कमी वजनाचे खेळाडू सहभागी झाले होते. कठोर परिश्रमाच्या जोरावर अथर्व ने देशाचा गौरव वाढविला. या स्पर्धेसाठी नगर जिल्ह्यातून 22 खेळाडू सहभागी झाले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अर्थव हा सर्वसामान्य कुटूंबातील मुलगा असून तो सध्या 12 वीत आहे. कोणत्याही खेळाडूचा वारसा नसणार्या अथर्वला अगदी लहान वयापासूनच खेळाची विशेष आवड होती. वयाच्या दहाव्या वर्षापासून अर्थव किक बाॅक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षक म्हणून त्याला गणेश कुसळकर व गोकुळ सोलाट हे प्रशिक्षण देत आहेत. राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेउन त्याने अनेक पदकही प्राप्त केले आहेत. अथर्वला आता ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून द्यायचे आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.