Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हास्तर 62 वी सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल क्रीडा स्पर्धा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 10 जुलै –  क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंकरीता सबज्युनिअर (14 वर्षाआतील मुले) क्रीडा स्पर्धा मुले वयोगट दि. 1 जानेवारी 2010 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनिअर 17 वर्षाखालील मुले व मुली दि. 1 जानेवारी 2007 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल (सबज्युनिअर/ज्युनिअर) क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघानी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापुर्वीच www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू व संघांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व सांस्कृतीक भवन, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे ऑफलाईन प्रवेश अर्ज दि. 16 जुलै, 2023 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूकडे जन्मदाखला, आधारकार्ड, खेळाडू ओळखपत्र, पासपोर्ट (सर्व मूळ प्रतीत) असणे अनिवार्य आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी होणार असून, त्यामध्ये एखादा खेळाडू अधिक वयाचा आढळल्यास संपुर्ण संघ बाद करण्यात येणार आहे, याची संबंधीत संघांनी नोंद घ्यावी.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्पर्धा आयोजन : स्पर्धा स्थळ नेताजी सुभाषचंद्र हायस्कुल तथा ज्यु. कॉलेज, सुंदरनगर ता. मुलचेरा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

  14 वर्षे मुले व 17 वर्षे मुली : दि. 17 ते 18 जुलै 2023 
  17 वर्षे मुले : दि. 18 ते 19 जुलै 2023 
 उपस्थिती : स्पर्धेच्या दिवशी  सकाळी 09.00 वाजता
प्रवेश अर्जावर खेळाडूचे संपुर्ण नांव, जन्मतारीख, वर्ग, आधार क्रमांक, शाळेचे नांव, पत्ता, शाळेचा युडायस क्रमांक, खेळाडू स्वाक्षरी, रजिस्टर नंबर, मोबाईल क्रमांक, संस्था प्रमुख / मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीने पाठवावा. 14 वर्षाआतील खेळाडूंकरीता वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.
तरी संघाचा प्रवेश अर्ज विहीत मुदतीत कार्यालयात सादर करुन जास्तीत जास्त संघांनी / शाळांनी सहभागी व्हावे. प्रवेशिकेची एक प्रत स्पर्धास्थळी देणे व संघ वेळेवर स्पर्धा स्थळी उपस्थित ठेवणे अनिवार्य आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली यांनी केले.

हे पण वाचा :- 

Comments are closed.