Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शरत कमल यांना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 15 नोव्हेंबर :- भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2022 सालच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात गेली दोन दशके टेबल टेनिसमध्ये भारताचे नाव जगाच्या नकाशावर झळकवणार्या एका दिग्गज खेळाडूला खेल रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या खेळाडूचे नाव अचंता शरत कमल असे आहे. शरत कमल आज 40 वर्षोंचा आहे. तीन महिन्यापूर्वी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत याच शरत कमल ने भारताला तब्बल तीन सुवर्णपदक जिंकून दिले आहेत. त्याच्या आजवरच्या कामगिरीचा सन्मान करतांना भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी त्याच्या नावाची घोषणा केली आहे.

टेबल टेनिसमध्ये शरत कमल हे नाव आदराने घेतले जाते. वयाच्या चाळीसाव्या वर्षी शरतच्या खेळातील चपळता वाखाण्याजोगी आहे. त्यामुळे अनेक युवा खेळाडूंसाठी शरत कमल प्रेरणास्थान बनला आहे. तामिळनाडूच्या चेन्नईमधील कमलने वयाच्या चौथ्या वर्षीपासूनच टेबल टेनिसची रॅकेट हातात घेतली. या खेळाचा वारसा त्याला घरातुनच मिळाला होता. शरत कमलचे वडील आणि काका राज्य स्तरावर टेबल टेनिस खेळले होते. पण कमलने त्यांच्याही पुढे जात मोठी मजल मारली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शरत कमलला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतला सर्वात यशस्वी खेळाडू मानले जाते. आपल्या 16 वर्षाच्या कारकीर्दीत त्याने भारतासाठी राष्ट्रकुलमध्ये 13 पदक जिंकले आहेत. सर्वाधिक राष्ट्रकुल पदकविजेत्या भारतीय खेळाडूंमध्ये शरत तिसर्या क्रमांकावर आहे. शरतच्या आधी पहिला क्रमांक लागतो तो नेमबाज जसपाल राणाचा. राणाने राष्ट्रकुल स्पर्धेत 9 सुवर्णपदकांसह तब्बल 15 पदक पटकावली आहेत. तर समशेरच्या नावावर 7 सुवर्णपदकांसह 14 पदक आहेत. राष्ट्रकुल सह एशियाड आणि एशियन चॅम्पियनशीप मध्येही पदकांची कमाई केली आहे.

शरत कमल ने आतापर्यंत तब्बल 10 वेळा राष्ट्रीय चॅम्पियन ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा एकमेव टेबल टेनिसपटू आहे. मात्र, शरत कमलला ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावणी दिली. त्याने 2004 च्या सिडनी, 2008 च्या बिजींग, 2016 च्या रिओ आणि 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, त्याला पदकाशिवाय परतावे लागले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

Comments are closed.