IPL पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबईच्या संघानं दिल्लीचा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक.
सहाव्यांदा मुंबईच्या संघाची फाइनल मध्ये धडक.
मुंबईच्या टीमसमोर आता आयपीएलचे पाचवे विजेतेपद पटकवण्याचे लक्ष असेल. मात्र, दिल्लीकडे फायनलमध्ये पोहोचण्याची अजून एक संधी उपलब्ध आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातही विजयी पताका रोवण्यासाठी मुंबईच्या संघानं त्याच रोखानं प्रवास सुरु केला आहे. IPL 2020 मधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबईच्या संघानं दिल्लीचा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. मुंबईच्या संघानं दिल्लीचा ५७ धावांनी पराभव केला.
चार गडी बाद करत आपल्या गोलंदाजीनं विरोधी संघात दहशत निर्माण करणारा जसप्रीत बुमराह यावेळी विजयाचा खरा हिरो ठरला. शिवाय त्यानं या सामन्यात काही विक्रमही रचल्याचं पाहायला मिळालं.
गेल्यावर्षीही मुंबईने आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. मुंबईचे हे चौथे जेतेपद होते आणि आयपीएलच्या जेतेपदांचा चौकार लगावणारा तो पहिला संघ ठरला होता. गेल्यावर्षीच्या आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबईपुढे आव्हान होते ते महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचे. या अंतिम फेरीत मुंबईने फक्त एका धावेने चेन्नईवर विजय मिळवला होता. या एका धावेच्या विजयाच्या जोरावर त्यांनी जेतेपदही आपल्या नावावर केले होते.
यापूर्वी मुंबईच्या संघाने २०१७ साली आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली होती. हे मुंबईचे तिसरे जेतेपद होते. यावेळी मुंबईच्या संघाला अंतिम फेरीत आव्हान दिले होते ते रायझिंग पुणे जायटंस् या संघाने. हा अंतिम फेरीचा सामना चांगलाच रंगतदार झाला होता. या अंतिम सामन्यातही मुंबईने फक्त एका धावेने विजय मिळवला आणि जेतेपद आपल्या नावावर केले होते.
Comments are closed.