टीम इंडिया न्यू लूक जर्सी मध्ये यूएईहून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
स्पोर्ट्स डेस्क:
आयपीएल ची धुम आता संपली असून भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी युएईवरून ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे.ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघ तीन सामन्यांची टी – 20 मालिका आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेचा पहिला सामना डे-नाईट खेळला जाईल.यावेळी टीम इंडिया नवीन जर्सीत दिसणार आहे.
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी युएईवरून ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. कोरोना साथीच्या काळात हा भारतीय संघाचा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा आहे. यावेळी सर्व भारतीय खेळाडू खास पीपीई किटमध्ये दिसत होते. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी – 20 मालिका आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेचा पहिला सामना डे-नाईट खेळला जाईल. ऑस्ट्रेलिया गाठल्यानंतर भारतीय खेळाडू 14 दिवस क्वारंटाईन होणार आहे. या दौर्याची चांगली गोष्ट म्हणजे क्वारंटाईन असतानाही खेळाडू सराव करू शकतील. आयपीएलच्या वेळी असं नव्हत.
भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा अद्याप भारतीय संघासह ऑस्ट्रेलियाकडे रवाना झालेला नाही. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) सराव करणार आहे. एकदिवसीय आणि टी -20 मालिकेत रोहितला विश्रांती देण्यात आली आहे. पण कसोटी मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्याची सुरुवात 27 नोव्हेंबरला पहिल्या एकदिवसीय सामन्याने होईल. यानंतर तीन एकदिवसीय आणि तीन टी -20 आणि त्यानंतर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.
Comments are closed.