Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे.

वेलिंग्टनमध्ये आतापर्यंत एकही टी-20 सामना नाही जिंकला!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वेलिंग्टन 18 नोव्हेंबर :- ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड कप 2022क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट टीमचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला होता. या पराभवामुळे भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न धुळीस मिळालं. आता हा पराभव  विसरून न्यूझीलंडविरुद्ध 3 मॅचची टी-20 क्रिकेट सीरिज खेळण्यास टीम इंडिया सज्ज आहे.

मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या स्टेडियमवर भारताचं रेकॉर्ड अतिशय खराब आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 मॅचच्या टी-20 सीरिजमधील पहिली मॅच 18 नोव्हेंबर 2022 रोजी खेळवली जाणार आहे. या सीरिजसाठी अनेक तरुण खेळाडूंचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा ही सीरिज जिंकण्याचा संकल्प आहे. पण, या टीममधील 3 खेळाडू या संकल्पात अडथळा ठरू शकतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टी20 वर्ल्ड कपमधला पराभव विसरुन टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्धच्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. वेलिंग्टनमध्ये आज भारत आणि न्यूझीलंड पहिला टी20 सामना खेळवला जात आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारताचा युवा संघ किवींविरोधात दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पण सामना सुरु होण्याआधी क्रिकेट चाहत्यांमध्ये निराशा आहे. याला कारण ठरलंय वेलिंग्टनमधलं सध्याचं वातावरण.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.