Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वेलगुरचा व्हॉलीबॉल संघ तालुक्यात प्रथम

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 5 सप्टेंबर : आलापल्ली येथील तालुका क्रीडा संकुलात सुरू असलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत 17 वर्षे वयोगटातील व्हॉलीबॉल प्रकारात सर्व संघांना पिछडून राजे धर्मराव हायस्कूल वेलगुरच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकाविला. क्रीडा स्पर्धांतील यशाच्या मागे प्रशिक्षक विजय दंडारे यांनी दिलेल्या कौशल्याचे आधारे या खेळात यश संपादन झाल्याचे खेळाडूंनी सांगितले.

स्पर्धेत जनार्दन झाडे, प्रवीण बुरान यांनी पंचांची उत्तम कामगिरी निभावली. यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर भुते, प्रशांत कुंडू, नंदकिशोर झोडे ,संजय गरमाळे, चांदेकर, अक्षय, सिडाम यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय खेळाकरिता खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.