Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महिला टी 20 वर्ल्ड कप: टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनल

मॅच गुरुवारी 23 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजून 30 खेळवण्यात येणार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

केपटाऊन 22 फेब्रुवारी :- महिला टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने धडक मारली आहे.आयर्लंडचा 20 फेब्रुवारीला 5 धावांनी पराभव करत सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म केलं. टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग तिसरी वेळ ठरली आहे. टीम इंडिया आता वर्ल्ड कप जिंकण्यापासून फक्त 2 विजय दूर आहे. टीम इंडियाचा गेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं होतं. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा अंतिम सामन्यात पराभव केला होता. आता त्याच गतविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये सामना होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल मॅच गुरुवारी 23 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 6 वाजता टॉस होणार आहे. या निर्णायक सामन्यात टॉसची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. या सामन्याचं आयोजन हे केपटाऊनमधील न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे.टीम इंडियाने वर्ल्ड कप मोहिमेत आतापर्यंत पाकिस्तान, विंडिज, इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्ध 4 सामने खेळले. यात आयर्लंडचा अपवाद वगळता रिचाने सातत्याने शानदार कामगिरी केली.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर आणि राजेश्वरी गायकवाड.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

वनजमिनीवर अवैध ताबा, विक्री प्रकरणात दोषारोप उघड होताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला केले निलंबित

 

Comments are closed.