Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विड्रॉल पाचशेचा निघायचे अडीच हजार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नागपूर, दि. १५ जून :  एटीएम मधून पाचशे रुपये विड्रॉल साठी टाकले असता अडीच हजार रुपये विड्रॉल होत असल्याने नागरिकांनी एटीएम च्या तांत्रिक बिघाडाचा फायदा घेण्यासाठी एटीएम बाहेर एकच गर्दी केलेली होती. मात्र वेळीच पोलिसांनी एटीएम च्या शटर बंद करून नागरिकांना निराश केलं.

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा च्या शिवा मार्केटमध्ये ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. एटीएम मधून पाचशे रुपये विड्रॉल साठी टाकले असता त्यातून अडीच हजार रुपये निघत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आलं. ही माहिती बघता बघता आजूबाजूच्या गावात पसरली आणि रात्री उशिरापर्यंत एटीएम बाहेर पैसे काढणाऱ्यांची गर्दी होऊ लागली. मात्र काहींनी हा प्रकार पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी एटीएम मध्ये येऊन एटीएम सेंटर बंद केला आणि पोलीस बंदोबस्त लावण्यात आले.

त्यामुळे पैसे काढायला येणाऱ्या लोकांची मात्र निराशा झाली. याबाबत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देत एटीएम मशीन दूरस्थ करण्यात आले. मशीन मध्ये तांत्रीक बिघाड झाल्याने नागरिकांनी याचा भरपूर फायदा घेतला.

हे देखील वाचा : 

पुन्हा वाघाच्या हल्ल्यात आणखी एका शेतकऱ्याचा बळी.!

आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभार

 

Comments are closed.