Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

2022 चा उपमहापौर श्री वासिम शेख तर स्वर्गीय लता मंगेशकर महिला उपमहापौर श्री चा किताब पूजा गौडा ला प्रदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क,  दि. ८ फेब्रुवारी : पुणे शहरातील अतिशय महत्त्वाचा आणि प्रतिष्ठित समजला जाणारा उपमहापौर श्री चा सन्मान वासिम शेख ला मिळाला तर पुण्यात पहिल्यांदाच महिलांची स्पर्धा प्रचंड ऐतिहासिक ठरली त्यामध्ये स्वर्गीय लता मंगेशकर महिला उपमहापौर श्री चा किताब पूजा गौडा ला मिळाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पुण्यनगरीचे उपमहापौर सूनिताताई वाडेकर यांच्या हस्ते पुरस्कार व बक्षीस, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर राजेश इरले, महेंद्र पगडे, स्नेहा प्रकाश उपस्थित होते.

दलीत चळवळीचे नेते व सामाजिक कार्यकर्ते , पँथर परशुराम वाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त बॉडी बिल्डर अँड फिटनेस आसोसियशन पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय महिला व पुरुष शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित केली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.विशेष बाब म्हणजे महिला स्पर्धा अतिशय चुरशीची झाली. महिलांनी या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

या स्पर्धेतील प्रमुख विजेते खालीलप्रमाणे आहेत.

५५ किलो वजनी गटात – प्रथम सलमान नालबंद तर द्वितीय प्रफुल्ल रोकडे,

६० किलो वजनी गटात –  प्रथम हर्षद काटे तर द्वितीय नरेंद्र वाल्हेकर

६५ किलो वजनी गटात – प्रथम ज्ञानेश्वर सोनवणे तर द्वितीय अरबाज शेख,

७० किलो वजनी गटात – प्रथम प्रथमेश मिसाळ तर द्वितीय निखिल गायकवाड ,

७५ किलो वजनी गटात – प्रथम श्रीकांत भोसले तर द्वितीय  प्रशांत कोराळे

८० किलो वजनी गटात – प्रथम वासिम शेख तर द्वितीय प्रसाद सुतार यासह विविध विजेत्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला .

या स्पर्धेत परीक्षक म्हणून अजय गोळे, मंगेश परदेशी, युनूस काझी यांनी काम पाहिले.

 

Comments are closed.