Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“या” जिल्ह्यात 2.2 रिश्टर स्केलचा भुकंप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

लातूर, दि. २३ सप्टेंबर : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे हासोरी परिसरात पहाटे 3 वाजून 38 मिनिटांनी 2.2 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का जाणवला असल्याची माहिती लातूरचे जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी पञकार परिषदेत दिली.

मागील काही दिवसांपासून निलंगा तालुक्यातील मौजे हासोरी परिसरात जमिनीतून मोठे आवाज येत आहेत.या भागातील नागरिक भयग्रस्त झाले आहेत. या भागात भुकंपाचे धक्के जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. प्रशासन माञ भुकंप नाही, केवळ जमिनीतून आवाज येत आहेत असे सांगितले जात होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज सकाळी 3.38 मिनिटांनी पहाटे 2 रिश्टर स्केलचा भुकंप झाला असून त्याची नोंद भुकंप मापक वेधशाळेने घेतलेली आहे. लातूर येथील भुकंप वेधशाळेपासून 52 किलोमीटर अंतरावर हासोरी परिसरात यांचा केंद्रबिंदू होता. जमिनीखाली 5 किलोमीटर अंतरावर तो असल्याचे सांगितले जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी राष्ट्रीय भुकंप केंद्र पृथ्वी विज्ञान मंञालयाचे शास्ञज्ञ राजीव कुमार, अजयकुमार शर्मा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील भुशास्ञ संकुलाचे प्रमुख प्रा.डाॅ.अविनाश कदम, प्रा.डाॅ. अर्जन भोसले हे उपस्थित होते.

हे देखील वाचा:

अखेर शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचाच दसरा मेळावा होणार!

दुष्काळी क्षेत्रात 2100 पपईचे झाडापासून घेतले 22 लाखाचे उत्पादन..

 

Comments are closed.