Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून पळून जाणारा विकृत तरुण गजाआड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

डोंबिवली, दि. १६ फेब्रुवारी :  अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत पळून जाणाऱ्या एका विकृत तरुणाला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक केली आहे.

अमन यादव अस या तरुणाच नाव आहे. डोंबिवली मधील  एका इमारतीमध्ये  एक लहान मुलगी आपल्या इमारतीच्या जिन्यातून खाली उतरत असताना तिला एका तरुणाने अश्लील स्पर्श केला. मुलीला जाणवताच ती घाबरली घरी धाव घेत मुलीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांनी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केला मात्र तो पसार झाला ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात या तरुण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी या तरुणाचा शोध सुरू केला. परिसरातील सर्व सीसीटीव्ही पोलिसानी तपासले  इतकेच नाही तर एके ठिकाणी तोच तरुण त्याच्या बाईक सह आणखी एका सीसीटीव्हीत कैद झाला होता पोलिसांनी सीसीटीव्हीत दिसणाऱ्या बाईक च्या आधारे त्याचा शोध सुरू करत गाडी शोधून काढली पोलिसांनी अमन यादव याला ताब्यात घेतले. अमन यादाव हा प्रयागराज विद्यापीठातील विद्यार्थी आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

उपविभागीय वनाधिकारी देवगडे यांची पत्रकारांशी उद्धट वागणूक; म.रा.प. संघटनेतर्फे निवेदन देऊन केला तीव्र निषेध

१५ लाखाच्या खवा चोरी प्रकरणी पोलीस शिपायासह ४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

राजनगरीत अतिक्रमण हटाव मोहीम; नगर पंचायत ची निवडणूकी नंतर मोठी कार्यवाही

 

Comments are closed.