अदानी समूहाने अमेरिकेतील 506925 कोटी 44 लाखांचा बाँड केला रद्द.
गौतम अदानी यांचा अदानी समूह मोठ्या अडचणीत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
राज्य वितरण कंपन्यांसोबत सौर ऊर्जा करार करण्यासाठी गौतम अडाणी यांचा अदानी समूहाणे भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना 2,110 कोटी रुपयांची लाच दिल्याची माहिती आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सदरची लाच ही 2020 ते 2024 या काळात देण्यात आल्याचा आरोप अदानी समूहावर करण्यात आला आहे. मात्र अदानी समूहाने या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया दिली असून केलेले सर्व आरोप निराधार आणि धादांत खोटे असल्याचा दावा केला आहे. इतकेच नाही तर कंपनीने अमेरिकेतील 506925 कोटी 44 लाखांचा ( 600 दशलक्ष डॉलर) बाँड रद्द केला आहे अमेरिकेतील एका मोठ्या गुंतवणुकीला ब्रेक लावला आहे.
सादर प्रकरणी अदानी समूहाने कायदेशीर लढा देण्याचे ठरविले आहे. अदानी समूह नियमानुसार आणि पारदर्शकता काम करत असल्याचे कंपनीने सांगीतले. सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि कायदे-नियमांचे पालन करत असल्याचे आश्वासन अदानी समूहाकडून देण्यात आले आहे. अदानी समूहाच्या संचालकां विरोधात अमेरिकेतील न्याय विभाग आणि अमेरिकेतील सिक्युरिटीज आणि एक्सचेंज कमिशनने गंभीर आरोप केले आहे. यामुळे गौतम अदानी यांचा अदानी समूह मोठ्या अडचणीत सापडला. .
अमेरिकेतील न्याय विभाग आणि सिक्युरिटीज आणि एक्सचेंज कमिशनने गौतम अदानी, सागर अदानी आणि इतर संचालकाविरोधात दिवाणी प्रकरण दाखल केले आहे. परंतु हे आरोप निराधार असल्याचा दावा अदानी समूहाने केला आहे. तर न्यूयॉर्क येथील पूर्व जिल्हा कोर्टात त्यांच्याविरोधात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. तर अमेरिकेतील न्याय विभागाने संचालक मंडळातील सदस्य विनीत जैन यांच्याविरोधात फौजदारी आरोप दाखल केलेला आहे.
हे ही वाचा,
गडचिरोली विधानसभा आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार
Comments are closed.