Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षल्यांच्या बालेकिल्ल्यात प्रशासनाची मान्सून पूर्व तयारी!

पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या दुर्गम गावात पोहोचले कुमार आशीर्वाद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ओमप्रकाश चुनारकर,

जिल्हा निर्मिती नंतर पहिल्यांदाच मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फोदेवाडा या गावात भेट देऊन स्थानिक नागरिकांचे आस्थेने विचारपूस केली. त्यावेळी स्थानिक गावातील नागरिकांनी आरोग्य, शिक्षण, वीज, रस्ता यासंदर्भात समस्या सांगितली. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलेल्या सर्व समस्येचे निराकरण प्रशासनामार्फत लवकरात लवकर करण्यात  येईल. अशी ग्वाही दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली, दि. २१ मे : राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या बिनागुंडा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल दि. २० मे रोजी आढावा घेण्यासाठी जिल्ह्यापासून २५० किमी अंतर गाठले त्यासाठी त्यांना  ८ ते १० किमी अंतर पायदळी खडतर प्रवास करून नक्षल्यांच्या बालेकिल्ल्यात पोहोचले. त्यानंतर त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत आस्थेने विचारपूस केली. येणाऱ्या पावसाळ्यात गुंडेनुर नदी पलीकडच्या सर्वच गावांचा संपर्क तुटत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांच्या आढावा घेऊन मान्सून पूर्व तयारी करण्याचे निर्देश दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या आढावा दरम्यान कुमार आशीर्वाद यांना नक्षलग्रस्त आदिवासी बहुल दुर्गम भागात असलेल्या गावांमध्ये अनेक समस्याने जर्जर असल्याचे निदर्शनास आले. मुख्यता रस्ते, विज, पाणी, याशिवाय पावसाळ्यात आवागमन करणाऱ्या नदी-नाल्यावर पूल नसल्याने आणि पक्के रस्तेही नसल्याने या परिसरातील नागरिकांना आरोग्याची समस्या उद्भवल्यास तारेवरची कसरत करावी लागते.

बिनागुंडा तसेच छत्तीसगड राज्यातील खेड्यापाड्यातील नागरिकांनाही भामरागड तालुक्यात  असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी येथे उपचारासाठी आल्याशिवाय पर्याय नाही. सदर हे क्षेत्र अबुजमाड  सीमेलगत दंडकारण्यात मोडत असून या परिसराला नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असल्याने केंद्र सरकारने या भागाला असुरक्षित क्षेत्र मानले आहे. त्यामुळे या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना  या ठिकाणी सेवा देणे म्हणजे काळ्या पाण्याची सजाच वाटते.

पावसाळ्यात या भागात एकही कर्मचारी पोहचू शकत नाही. त्यामुळे आरोग्याची समस्या उद्भवल्यास, गरोदर मातांना प्रसूतीसाठी तारेवरची कसरत करीत कंबरेभर पाण्यातून खाटेवर घेऊन लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्याशिवाय पर्याय नाही. अश्या परिस्थितीत वेळेवर उपचाराअभावी अनेक गरोदर मातांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्राथमिक उपचार मिळणे हेतू  गावातील आशाताई आणि एका सुशिक्षित तरुणाची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करून प्रथमोपचार म्हणून देण्यात येणाऱ्या औषधी बाबतची माहिती देण्यात आली आहे. जेणेकरून पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावातील नागरिकांना आरोग्याची समस्या उद्भवल्यास गावाताच प्रथमोपचार दिला जाईल.

त्यामुळे या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याठिकाणी सेवा देण्यासाठी  नियुक्त केलेल्या गावामध्ये आशावर्कर, तलाठी, ग्रामसेवक हजर असतात की नाही यावर चर्चा करून सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून सेवा देण्याचे निर्देश आशीर्वाद यांनी दिले.

 स्थानिकांनी वाचला समस्यांचा पाढा

मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद बिनागुंडा,फोदेवाडा आदि गावात भेट देऊन समस्या विचारले असता दरम्यान स्थानिक आदिवासी बांधवांनी समस्यांचा पाढा वाचला. यात प्रामुख्याने पिण्यासाठी पाण्याची सुविधा, गावात समाजासाठी गोटूल चे बांधकामं करण्याची मागणी केली.

सौर उर्जेच्या प्लेटने घराघरात पोहोचेल लाईट

देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मिरवून घेत असले तरी गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील आजही वीज पोहोचली नाही. त्यामुळे प्रशासनाने दुर्गम भागात विजेची समस्या सोडविण्यासाठी सौर उर्जेचे प्लेट लावून घराघरात व खांबावर लाईट लावल्याने  विजेची समस्या काही प्रमाणत सुटली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

दुर्गम भागातील गावामध्ये मिळणार शुद्ध मुबलक  पाणी 

नक्षलग्रस्त दुर्गम ग्रामीण भागात शुद्ध व पुरेसे पानी उपलब्ध व्हावे म्हणून जल जीवन मिशन हाती घेतले असून २०२४ पर्यंत “हर घर नल से जल” हा मानस डोळ्यासमोर ठेवण्यात आला असल्याने सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप नळ पाणी पुरवठा डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण करून पाण्याची सुविधा करण्यात होईल. अशी माहिती कुमार आशीर्वाद यांनी दिली.

कुमार आशीर्वाद यांनी राजीरप्पी धबधब्याला दिली भेट

बिनागुंडा हे निसर्गाच्या कुशीत वसलेला गाव असून  या ठिकाणी डोंगर, दर्या, खडकाळ दाट जंगलासह मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आढळून येतात. याशिवाय बिनागुंडात राजीरप्पी धबधबा असल्याने पर्यटकांसाठी मोठे आकर्षण असून निसर्गरम्य वातावरणाने मन मोहून टाकते. राजीरप्पी धबधब्यातून बाराही महिने खडकातून पाणी वाहत असते. त्यामुळे पर्यटक धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातून खडतर प्रवास करून जात असतात.

 

Comments are closed.