Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माझ्या कडून कामे करुन घेण्यासाठी श्रीकांत देशपांडे यांनाच विजयी करा- वर्षा गायकवाड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती डेस्क ३० नोव्हेंबर :- विधीमंडळात सातत्याने शिक्षक आमदार म्हणून प्रा. देशपांडे यांनी आवाज उठविला आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळातही ते सतत शिक्षकांच्या समस्या सोडविण्याकरिता प्रयत्न करीत होते. सार्वजनिक जीवनात काम करतांना समाजाचे काम करायला हवे असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा.श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारार्थ शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड संवाद सभेचे आयोजन हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथील ऑडीटोरियम हॉल येथे करण्यात आले होते. सभेला शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ज.मो.अभ्यंकर, आ.सुलभा खोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, माजी महापौर विलास इंगोले, राजू गोडसे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी मंचावर विराजमान होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की, शिक्षकांची जुनी पेन्शन योजना, शिक्षक सेवकांची भरती, विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करीत आहे. महाविकास आघाडीचे सरकार शिक्षकांसोबत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात सर्वात जास्त व्हीसी शिक्षण विभागाच्या घेवून शिक्षण विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षकांच्या समस्या सभागृहात अभ्यासपूर्ण मांडून सोडवून घेण्याकरिता प्रा.श्रीकांत देशपांडे यांना निवडून आणण्याचे आवाहन वर्षा गायकवाड यांनी उपस्थितांना केले.

Comments are closed.