Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अंधेरी पोटनिवडणुक लढवत नसल्याने शिंदे गट येणार अडचणीत ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. ९ ऑक्टोंबर :  शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह पक्षाच्या दोन्ही गटांना वापरता येणार नाही, असा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगानं काल दिला. धनुष्यबाणावर दोन्ही बाजूंनी दावा सांगितल्यानं ते चिन्ह निवडणूक आयोग गोठवेल, असा अंदाज होता. ठाकरे गटानं तशी तयारीदेखील केली होती. मात्र आयोगानं शिवसेना नाव न वापरण्याचा निर्णय देत शिंदे गटालाही धक्का दिला. त्यामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत

अंधेरीतील पोटनिवडणूक भाजप लढत असल्यानं शिंदे गटानं या ठिकाणी उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय बदलण्याची शक्यता आहे. आपण शिवसेना, धनुष्यबाणावर दावा करत आहोत. तर अंधेरीतील पोटनिवडणूक आपण लढवायला हवी, अशी शिंदे गटातील आमदारांची भूमिका आहे. शिंदे गटाच्या आमदारांची आज संध्याकाळी बैठक होत आहे. त्या बैठकीत याबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. याबद्दलचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं प्रचाराची तयारी केली आहे. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांना काँग्रेस, राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आहे. लटके यांच्यासमोर भाजपचे मुरजी पटेल यांचं आव्हान असेल. आता या निवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवारही असू शकतो. त्यामुळे तिरंगी लढत पाहायला मिळू शकते.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बोकडविरा विद्युत निमिर्ती प्रकल्पात स्फोट; ३ जण गंभीर भाजले

फॉरेस्ट रन स्पर्धेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूसह हजारो धावपटू आणि क्रीडाप्रेमींचा सहभाग…

Comments are closed.