गोंदिया वरून पुण्याला जाणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीचा चालत्या खासगी बस ट्रॅव्हल्स मध्ये अत्याचार.
वाशिम च्या मालेगाव परिसरात अत्याचार केल्या ची घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वाशिम 11 जानेवारी:- महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचार थांबण्याचं काही नाव घेत नाही. दररोज कुठे ना कुठे अत्याचाराच्या घटना घडत आहेत. गोंदियावरून गुडविल्स कम्पनी ची ट्रॅव्हल्स ने पुण्याला जाणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये विनयभंग. झाल्याची घटना घडलीय. चालत्या खासगी बस ट्रॅव्हल्समध्ये अत्याचार करून वाशिमच्या मालेगाव परिसरात अत्याचार केल्याची घटना घडलीय.
संबंधित तरुणीवरील अत्याचाराची घटना 6 जानेवारीला घडलीय. पीडित तरुणीने पुण्यात पोहोचताच पोलिसांत तक्रार दिल्याने घडलेला सारा प्रकार समोर आला आहे. आरोपीने पीडित तरुणीला सीट नंबर तुमची नसल्याचं कारण सांगून मागच्या सीटवर बसवले आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला. तसंच घडलेल्या घटनेची वाच्यता केल्यास चालत्या गाडीतून फेकून देण्याची धमकी आरोपीने दिली.
पुण्याची पोलिसांनी वाशिम कडे हा गुन्हा वर्ग केला असून पोलिसांनी घडलेल्या घटने मधील गुडविल्स कम्पनी ची ट्रॅव्हल्स जप्त केली असून आरोपी हा चा असून समीर देवकर असल्याचं पोलिसांनी सांगितले दरम्यान घटनेचा तपास मालेगाव पोलीस करत आहे.
Comments are closed.