Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पाली त्रिपिटक भाषांतर प्रकल्पासाठी बार्टीने तज्ज्ञ समिती गठीत करावी – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. ६ जानेवारी : पाली त्रिपिटक भाषांतर प्रकल्पासाठी बार्टीने तज्ज्ञ समिती गठीत करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. मंत्रालयातील दालनात पाली त्रिपिटक भाषांतर प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला सामाजिक न्याय विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी,समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे,बार्टीचे उपायुक्त सोनावणे उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, बौद्ध धर्मातील अत्यंत प्राचीन साहित्य असलेल्या त्रिपिटकांच्या भाषांतरासाठी बार्टीने तज्ज्ञ समिती गठीत करावी.पाली त्रिपिटक भाषांतर प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी या कामाला प्राधान्य देण्यात यावे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बार्टीने आतापर्यंत पाली त्रिपिटक भाषांतर प्रकल्पासाठी केलेल्या कामाबाबत माहिती बैठकीत  दिली.

हे देखील वाचा : 

दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू…

बदलत्या काळासोबत पत्रकारांनी विविध कौशल्ये आत्मसात करून पत्रकारिता करावी : मिलिंद खोंड

राज्यातील महाविद्यालयासंदर्भात मोठा निर्णय, सर्व अकृषी विद्यापीठ, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

Comments are closed.